शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हॉटस्पॉट मालेगावची गाडी रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

मालेगाव : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असताना, चीनमधील वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला तरुण मालेगावी परतला आणि शहरात एकच ...

मालेगाव : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असताना, चीनमधील वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला तरुण मालेगावी परतला आणि शहरात एकच घबराट पसरली. आरोग्य विभागाची एकच धावपळ झाली. रोज पथकाने त्याची तपासणी केली, परंतु तो ‘निगेटिव्ह’ निघाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, परंतु एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाने मालेगाव गाठलेच आणि मालेगाव राज्यात हॉटस्पॉट ठरले.

८ एप्रिल रोजी मालेगावात कोरोनाने पहिला बळी घेतला. यामुळे नागरिकांत प्रचंड दहशत पसरली. आरोग्य विभागही सतर्क झाला. त्या पाठोपाठ चार जण बाधित मिळून आले आणि तेथूनच शहरात ‘कोरोना’ची मालिका सुरू झाली. कोरोनामुळे बळींची संख्याही वाढू लागल्याने, मालेगाव हॉटस्पॉट ठरले. साहजिकच राज्य शासनाचेही लक्ष वेधले गेले. शहराची अवस्था वाळीत टाकण्यासारखी झाली. कुणी मालेगावी येईना अन्‌ कुणाला बाहेरगावी जाऊ देईना. ‘लॉकडाऊन’मुळे सर्व रुग्णालये बंद होती. बाधितांची जसजशी रुग्णसंख्या वाढू लागली, तसतशी त्यांना उपचारार्थ ठेवण्यासाठी जागेची गरज भासू लागली. प्रारंभी जीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. मात्र, शहरापासून दूर असल्याने नागरिकांची नाराजी लक्षात घेऊन शहरातच सहारा हॉस्पिटल मन्सुरा आणि मसगा महाविद्यालय उपचार सुरू झाले. फारान हॉस्पिटल, हज हाउस, दिलावर हॉल अधिग्रहीत करण्यात आले. आयएचडीपीमधील पाच इमारतींमध्ये रुग्ण ठेवण्यात आले. राज्य शासनाची मदत, आरोग्य विभागाची मेहनत, यामुळे अल्पावधीतच ‘कोरोना’वर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले आणि राज्यभरातून बाधित उपचारार्थ येऊ लागले. आज कोरोनाबाधितांचा मृत्युदर घटला आहे. मात्र, याच काळात मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या संख्येने ‘कोरोना’ने बळी घेतले होते. मात्र, मालेगावी आरोग्य विभागाने घेतलेल्या मेहनतीने त्यावर नियंत्रण मिळविले. दरम्यान, ‘मन्सुरा’ हॉस्पिटलच्या काढ्याची चर्चाही बरीच रंगली. मालेगावात महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७४ जणांचा कोरोनाने बळी घेतले आहेत. आज शहरात रिकव्हरी रेट ९२.८२ टक्क्यांवर आला आहे. मालेगाव मनपा क्षेत्रातील १४८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सुमारे ४३ रुग्णसंख्येपर्यंत आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविलेल्या कोरोनाचे आज मात्र १४८ रुग्ण उपचार घेत आहेत. मालेगावी आतापर्यंत एकूण ४ हजार ५४६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यातून ४ हजार २२४ रुग्ण बरे झाले आहेत. १७४ जणांना आपला जीव गमवावा लागला. सध्या १४८ जण उपचार घेत असून, रिकव्हरी रेट ९२.९२ टक्के इतका आज आहे. कोरोनाचे संशयित २६ हजार ५४४ रुग्ण तपासणीत ‘निगेटिव्ह’आले आहेत.

मालेगावी महापालिकेने विकास कामांसाठीचा निधी ‘कोरोना’वर खर्च केल्याने अनेक विकास कामे रखडली. मालेगावी नवीन बसस्थानकाजवळ सुरू असलेल्या उड्डाण पुलाचे काम रेंगाळलेले काम या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे.