--इन्फो-
नुकसानभरपाई देण्याची मागणी
हॉटेलमधील स्वयंपाकी रूपेश गायकवाड यांचा मृत्यू घातपातामुळे झाल्याचा आरोप करत नातेवाईकांची गर्दी जमली होती. घटना घडल्यानंतर आम्हाला मध्यरात्री कळवण्यात आले. तोपर्यंत माहिती लपविण्याचा प्रयत्न झाल्याचेही यावेळी नातेवाईकांकडून सांगण्यात आले. रूपेश हा त्यांच्या कुटुंबाचा कर्ता माणूस होता, त्यामुळे कुटुंबीयांना हॉटेलमालकांनी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून लावून धरण्यात आली होती.
--इन्फो---
संतप्त नातेवाईकांची पोलिसांकडून समजूत
हॉटेलच्या परिसरात जमलेल्या नातेवाईकांची गर्दी लक्षात घेता मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी मध्यस्थी करत नातेवाईकांची समजूत काढली. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता भांडारगृहात रूपेश सिलिंडर घेऊन जात होते यावेळी वीजपुरवठा बंद असल्याने त्यांनी विजेचे बटण दाबताच स्फोट झाल्याचे त्यामध्ये दिसते असे नातेवाईकांना पटवून सांगितले तसेच सीसीटीव्हीदेखील नातेवाईकांना दाखविले असता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
--
040921\04nsk_49_04092021_13.jpg~040921\04nsk_50_04092021_13.jpg
हॉटेल रामा हेरिटेजमध्ये आग~हॉटेल रामा हेरिटेजमध्ये आग