शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हाटबाजाराचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:37 IST

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा होऊन शहरातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी सहाही विभागात हाटबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर नाशिकरोड येथील मनपाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीतील जागेत हाटबाजार सुरू करण्याचे ठरविण्यात आले.

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा होऊन शहरातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी सहाही विभागात हाटबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर नाशिकरोड येथील मनपाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीतील जागेत हाटबाजार सुरू करण्याचे ठरविण्यात आले.  महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सत्यभामा गाडेकर यांनी महिला बचतगटांच्या विविध गृहोपयोगी वस्तूंसाठी हाटबाजार सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी सहा विभागात मनपाच्या विभागीय कार्यालयांमधील जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. महापालिकेच्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसंबंधीही सभापतींनी प्रशासनाला आदेशित केले. महापालिकेच्या एकूण ४१८ अंगणवाड्या असून, ज्या भाड्याच्या जागेत भरतात त्यांना जवळच्या महापालिका शाळांच्या इमारतीत स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदस्यांनी अंगणवाड्यांना भेटी देऊन पाहणी करण्याचेही ठरविण्यात आले. अंगणवाड्यांना पिण्याचे पाणी, शौचालय या मूलभूत सुविधा पुरविण्यावर चर्चा झाली.महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची नेमकी कर्तव्ये काय आहेत आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्यक्रम द्यायचा याची माहिती सभापती सरोज अहिरे यांनी दिली, तर सत्यभामा गाडेकर यांनी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीबाबत धोरण व नियमावली निश्चित होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे, ज्युदो-कराटेचे प्रशिक्षण देणे यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यावरही चर्चाझाली.  बैठकीला कावेरी घुगे, सत्यभामा गाडेकर, नयन गांगुर्डे, प्रियंका घाटे, शीतल माळोदे, समीना मेनन, पूनम मोगरे आदिंसह उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर, नगरसचिव ए. पी. वाघ आदी उपस्थित होते.