शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहीतेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाची तोडफोड

By admin | Updated: July 28, 2016 00:26 IST

नामपूर : दंगलीसह शासकीय मालमत्तेच्या नुकासानीचा गुन्हा

नामपूर : बागलाण तालुक्यातील गोराणे येथील विवाहिंतेच्या मृत्यूप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी नामपूर ग्रामिण रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात दंगलीसह शासकीय कामात अडथळा , शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गोराणे येथील विवाहिता सविता अरविंद देसले (२९) व तिचा पती अरविद श्रोवण देसले (३५) हे धार्मिक कार्यक्रमासाठी मंगळवारी (दि.२६) बिलपुरी येथे गेले होते. त्याठिकाणाहून परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने आसखेडा गावाजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यानंतर त्यांना पहाटे तीन वाजता नामपूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच सविता देसले यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागितले. मयत सविताचा घातपाताने मृत्यूू झाल्याचा संशय बिलपुरी येथील च्यिा माहेरच्या मंडळीनी व्यक्त केला. त्यामुळे बिलपुरी गाावातील १०० ते १५० महिला व नागरीकांचा समुदाय ग्रामिण रुग्णालयात दाखल झाला. आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी करीत जमावाने ग्रामिण रुग्णालयाची तोडफोड केली. संतप्त जमावाला अटकाव करणाऱ्या पोलिसानाही जमावाने धक्काबुकी केली. ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मधुकर गावित यांनी तोडफोडप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. मालेगावचे पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.राहूल खाडे, कळवणचे डीवायएसपी पाटील, सटाण्याचे पोलिस निरीक्षक बशिर शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. या घटनेचा जायखेड्याचे सहाय्यक निरीक्षक आर.एन.होळकर, उपनिरीक्षक एस.बी.कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (वार्ताहर)