शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी केली दरपत्रकांची होळी

By admin | Updated: July 10, 2017 00:17 IST

पाथरे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमिनीच्या थेट खरेदीसाठी दरपत्रक जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरे : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमिनीच्या थेट खरेदीसाठी जिल्हास्तरीय समितीने हेक्टरनिहाय शुक्रवारी दरपत्रक जाहीर केले. त्याविरोधात पाथरे येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकाची होळी केली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महागार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या सिन्नर तालुक्यातील जमिनींना रेडीरेकनरच्या पाचपट अधिक मोबदला दिला जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात कमीतकमी ४० लाख ९९ हजार ६९५ रुपये तर सर्वाधिक ८४ लाख ७१ हजार ८२० रुपये इतका हेक्टरी दर जाहीर करण्यात आला आहे. दर घोषित केल्यानंतर जमीन अधिग्रहण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.पाथरे खुर्द व वारेगाव या गावातील शेतकऱ्यांनी शासनाच्या कृतीचा जाहीर निषेध करीत ‘समृद्धी’विरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शासनाला वेळोवेळी विरोधाची निवेदने, ग्रामसभांचे ठराव, मोर्चे आदीद्वारे शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. जर शासन आपल्या भूमिकेवर ठाम असेल तर शेतकरीही आपल्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या प्रकल्पग्रस्तांचे अनुभव पाहता प्रकल्पग्रस्तांना पुरेपूर लाभ मिळालेला नाही. त्यांच्या पिढ्यांचे हाल झाले आहे. हे सर्व पाहता पाथरेकरांचा समृद्धी महामार्गास ठाम विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले दर मान्य नसून एक इंचही जमीन देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी जाहीर केले. समृद्धी महामार्गास विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र जमून दरपत्रकाची होळी केलीे. यावेळी वारेगावचे माजी सरपंच बाळासाहेब खळदकर, पाथरे खुर्दचे उपसरपंच सुखदेव गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, दिनकर गुंजाळ, निलेश गुंजाळ, बाळासाहेब राहणे, बंडू निकम, भीमाजी पवार, डॉ. राजेंद्र गुंजाळ, सुधाकर गुंजाळ, रमेश रहाणे, योगेश गुंजाळ, सविता गुंजाळ, निर्मला गुंजाळ, सुशीला गुंजाळ, कविता गुंजाळ, शांताबाई गुंजाळ, सोनाली गुंजाळ आदींसह शेतकरी उपस्थित होते.