नाशिक : आय़सी़एस़सी़ बोर्ड असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमीचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक कुमुदिनी बंगरे यांनी दिली़ या परीक्षेत होरायझनची विद्यार्थिनी निकिता विजय दरगोडे हिने ९३़५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर रोशनी शिवकुमार डागा हिने ९३़३३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला़ १५ विद्यार्थी उत्कृष्ट, तर सात विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ विविध विषयांमध्ये अनेक विद्यार्थी चमकले आहेत़ संगणक विषयात रिद्धी पाटील हिने १०० पैकी ९९ गुण, तर गणितामध्ये ९७ गुण मिळवले आहेत़ निकिता दरगोडे हिने विज्ञान विषयात ९४, हिंदीमध्ये ९५, समाजशास्त्रात ९४ व इंग्रजी विषयात ९२ गुण मिळवले आहेत़
होरायझन अकॅडमीचा दहावीचा शंभर टक्के निकाल
By admin | Updated: May 28, 2014 01:32 IST