शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

होरी खेले किसन गिरिधारी...

By admin | Updated: October 24, 2015 23:47 IST

कार्यक्रम रंगला : बासरीवादन, नृत्य कलाविष्काराला रसिकांची दाद

नाशिक : पन्नास विद्यार्थ्यांनी बासरीवादनातून सादर केलेली रागदारी... श्रीकृष्णाच्या वृंदावनात खेळल्या जाणाऱ्या होळीची नृत्याविष्कारातून झालेली पेशकश... त्यावर बासरीच्या स्वर्गीय सुरावटींनी चढवलेला कळस... अशा सर्वांगसुंदर मैफलीची अनुभूती अलोट गर्दीतल्या प्रत्येकाची सायंकाळ समृद्ध करून गेली...स्व. वसंतराव रामचंद्र नेवासकर स्मृती समारोहानिमित्त वेणुनाद सुषीर संवाद वर्गाच्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आज सायंकाळी ही मैफल रंगली. ‘वेणुनाद’च्या ५० विद्यार्थ्यांनी ‘स्वानुभूती’ कार्यक्रमात बासरी सहवादन करीत मैफलीला प्रारंभ केला. या विद्यार्थ्यांनी बासरीवर राग भूप सरगम पेश केला. सुयश देवधर, सचिन शाळिग्राम, डॉ. विशाल वाक्चौरे, राहुल सानप, राजश्री लखोटिया, मोहिनी सूर्यवंशी, मुग्धा जोशी यांनी राग बिलावल व यमनची सरगम, तर बालकलाकार दुर्वा कुलकर्णी, गार्गी शाळिग्राम, व्योम अध्यारू यांनी राग भूपची सुरावट सादर केली. दुसऱ्या टप्प्यात ‘होरी रंग सू भरिरी’ हा मोहन उपासनी यांच्या संगीत रचनेवर आधारित कार्यक्रम रंगला. वृंदावनमध्ये खेळल्या जाणाऱ्या होळीचे विविध रंग नृत्यांतून सादर करण्यात आले. ‘रंग में कैसे होरी खेलूंगी सॉँवरिया के संग’, ‘सावरे होरी खेलन आयो’, ‘कान्हा तेरी घुंगटिया पहनी हैं’, ‘सॉँवरियॉँ आपा होरी खेलो जी’, ‘रंग भरे रंग’, ‘किन संग खेलू होरी’ या गीतांवर आदिती पानसे-नाडगौडा, कीर्ती भवाळकर, सुमुखी अथनी यांनी नृत्ये सादर केली. सप्त रंगांची सप्त गाणी ज्ञानेश्वर कासार, अस्मिता सेवेकरी यांनी अप्रतिमरीत्या सादर केली. भूषण कोथमिरे (संवादिनी), सतीश पेंडसे (तबला), अभिजित शर्मा (आॅक्टोपॅड), अनिल धुमाळ (सिंथेसायझर), प्रसाद भालेराव (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. प्रेम, विरह, प्रतीक्षा अशा श्रीकृष्ण व राधेच्या निरनिराळ्या भावमुद्रांचे दर्शन घडवत या नृत्यांगनांनी रसिकांची दाद घेतली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. अरुण नेवासकर, श्रीकांत बेणी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. स्वानंद बेदरकर यांनी निवेदन केले. नेपथ्य व प्रकाशयोजना ईश्वर जगताप यांची होते. डॉ. मेधा उपासनी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संगीत वर्गाचे विद्यार्थी-पालकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)सोनार यांनी घेतली दाद

पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे मुंबईतील शिष्य विवेक सोनार यांच्या एकल बासरीवादनाने कार्यक्रमाला आगळ्या उंचीवर नेले. त्यांनी लयकारी, तंत्रकारी ही बासरीवादनाची वैशिष्ट्ये उलगडून दाखवत स्वर्गीय सुरावटींचा प्रत्यय दिला. ‘वाचस्पती’ या अनवट रागातील बंदिश सादर करीत त्यांनी बासरीच्या अद्भुत सामर्थ्याची प्रचिती दिली. त्यानंतर श्रोत्यांच्या पसंतीची धून सादर करीत त्यांनी मैफलीत कळस चढवला. ओजस अढिया यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली.