शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

गोदाकाठ परिसरात हुडहुडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:13 IST

थंडीची तीव्रता पुन्हा वाढली असून, शुक्रवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान २.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, परिसर थंडीने गारठला आहे.

ठळक मुद्देपिकांवर हिमकण : २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; द्राक्षबागांना फटका

लासलगाव/निफाड/खेडलेझुंगे : तालुक्यात थंडीची तीव्रता पुन्हा वाढली असून, शुक्रवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान २.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, परिसर थंडीने गारठला आहे.गेल्या चार ते पाच दिवसांपासून निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे गोदावरी किनाऱ्यावरील खेडलेझुंगे, रूई, थडीसारोळे, कोळगाव, कानळद आदी गावांसह परिसर गारठला आहे. राज्यात सर्वाधिक थंडी पुन्हा निफाड तालुक्यात परतली आहे. थंडीमुळे शेतपिकांवर दवबिंदू साचलेले आहे. आजच्या नीचांकी तापमानामुळे पिकांवर हिमकण आढळून आले आहेत. परिसरात पहाटे धुके दाटून येते. शुक्रवारी तर पाण्यातून वाफा निघताना दिसून येत होत्या. एकूणच सातत्याने घसरत असलेल्या तापमानामुळे पुन्हा एकदा निफाड तालुक्यात राज्यातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद शुक्रवारी झाली. परिसरातील वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. तसेच महिलावर्गहीस्वेटर, शॉलचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. परिसरात थंडीचा जोर वाढत असून, नागरिकांनी उबदारकपड्यांचा आधार घेण्यास सुरु वात केली आहे. गेल्या पंधरवड्यात थंडीने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात परिसरातील किमान तापमान आठ अंशाच्या जवळपास राहिले होते. दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, पेपर विक्रेते, सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले लोकही गारठले होते.द्राक्षमण्यांना तडे, उत्पादक चिंतित...गुरु वारी ९.२ अंशावर असणारे तापमान दुपारनंतर खाली येऊ लागले अन् सायंकाळी गाव वाडी-वस्तीवर शेकोट्या पेटल्या. अवघा तालुका थंडीने गारठला आहे. शुक्रवारी सकाळी कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रावर २.४ अंश तापमानाची नोंद झाली. तापमानात अचानक घट झाल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाला असून, द्राक्षमण्यांना तडे जाणे, पाने सुकणे, मुळ्याची वाढ खुंटणे असे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकरी भल्या पहाटे बागेत चिपाटे पेटवून ऊब तयार करीत आहे. मात्र वाढती थंडी गहू, कांदा, हरभरा पिकांसाठी पोषक ठरू लागली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन