शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा परिषदेचा दिल्लीत सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 01:29 IST

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देशपातळीवर प्रथम पुरस्कार, तर एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ एवढे गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसºया क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी हा सन्मान स्वीकारला.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण : पश्चिम विभागात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देशपातळीवर प्रथम पुरस्कार, तर एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ एवढे गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसºया क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी हा सन्मान स्वीकारला.आॅगस्ट महिन्यात देशभरात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ करण्यात आले होते. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींची केंद्रस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली होती. त्यात नाशिक जिल्ह्याचे काम उत्कृष्ट असल्याने तसेच केंद्र सरकारने विकसित केलेल्या मोबाइल अ‍ॅप एसएसजी २०१८ द्वारे देशात सर्वाधिक दोन लाख २२ हजार ५५१ प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्याने नोंदविल्याने महाराष्टÑ शासनाकडून औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला होता.  केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या गुणांकनातही जिल्ह्णाच्या या कामगिरीची दखल घेण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गंत शौचालय उपलब्धता व वापर, कचºयाचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जाणीव जागृती, स्वच्छतेचे प्रमाण, हागणदारीमुक्त गावाची टक्केवारी आणि पडताळणी, सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बाजाराची ठिकाणे, मंदिरे-जत्रास्थळे, घनकचरा व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर आधारित सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात नाशिक जिल्ह्णाला तिसºया क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सातारा जिल्हा प्रथम तर गुजरातमधील पाटण जिल्हा द्वितीय पुरस्काराचा मानकरी ठरला. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, केंद्रीय प्रधान सचिव परमेश्वर अय्यर, राज्याचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल आदी उपस्थित होते. पोषण आहारातही नाशिक.अव्वलसप्टेंबरपासून सुरू झालेल्या पोषण आहार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविण्यात आले आहेत. या अभियानात नाशिक जिल्हा देशात अग्रेसर आहे. पोषण आहार अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबाबत मंगळवारी शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने पोषण आहार अभियानाची सांगता झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्याचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला.