शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्याचा दिल्लीत सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:19 IST

नाशिक : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात सर्वाधिक आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्या बद्दल नाशिक जिल्ह्यात २ आॅक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान होणार आहे. याच दिवशी मुंबईतील कार्यक्रमात पोषण आहार अभियानात प्रथम स्थान मिळविण्यासाठीही गौरव होईल.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण कामाची दखल

नाशिक : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात सर्वाधिक आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्या बद्दल नाशिक जिल्ह्यात२ आॅक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान होणार आहे. याच दिवशी मुंबईतील कार्यक्रमात पोषण आहार अभियानात प्रथम स्थान मिळविण्यासाठीही गौरव होईल.पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, दीनदयाळ कौशल्य विकास कार्यक्रम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यापाठोपाठ आता जिल्ह्णास स्वच्छ सर्वेक्षण व पोषण आहार अभियान यात चांगले काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये ग्रामस्थांनी सहभागी व्हावे यासाठी जिल्ह्णात कुटुंब संपर्क अभियान राबवून घरोघरी गृहभेटी देण्यात आल्या. तसेच सरकारने विकसित केलेल्या मोबाइल अ‍ॅप ‘एसएसजी २०१८’च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्णासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याने जिल्हा २ लाख २१ हजार ३२१ प्रतिक्रिया नोंदवून देशात पहिल्या क्रमांकावर आल्याने नाशिक जिल्ह्णाचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्णात यात स्वच्छताफेरी, गृहभेटी, मोटारसायकल फेरी, श्रमदान मोहीम, स्वच्छतेचे फलक आदींद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र येथील स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आली. विविध ग्रामपंचायतींचे रंगरंगोटीने सुशोभिकरण करण्यात आले होते. याची दखल घेत करण्यात आलेल्या ग्रामीण मूल्यांकनासाठी केंद्र सरकारकडून १ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत गावांची तपासणी करण्यात आली होती.पोषण आहार अभियानांतर्गतही गौरवपोषण आहार अभियानात जिल्ह्णात १ सप्टेंबर पासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे नाशिक जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागातर्फे २ आॅक्टोबरला पोषण आहार अभियानाच्या सांगता कार्यक्रमात नाशिकचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या एक प्रकल्पाससह एका अंगणवाडी सेविकेचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांमध्ये नाशिक जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. याचे सर्व श्रेय संबंधित अधिकारी व कर्मचाºयांचे आहे. एकत्रित काम केल्यावर यश मिळते हेच या सन्मानातून सिद्ध झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशपातळीवर होणारा सन्मान हा नाशिक जिल्ह्णाचा व जिल्ह्णातील नागरिकांचा सन्मान आहे. -डॉ. नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.