शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता दक्ष महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:12 IST

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने ओला व सुका कचºयाचे विलगीकरण करून तो स्वतंत्र डब्यातून घंटागाडीत कर्मचाºयांकडे देणाºया दक्ष महिलांचा नुकताच सत्कार करण्यात आला.मनपाच्या सिडको आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत असून, या संकल्पनेतूनच ज्या महिला या त्यांच्या घरातील कचºयाचे ओला व सुका कचरा ...

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने ओला व सुका कचºयाचे विलगीकरण करून तो स्वतंत्र डब्यातून घंटागाडीत कर्मचाºयांकडे देणाºया दक्ष महिलांचा नुकताच सत्कार करण्यात आला.मनपाच्या सिडको आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत असून, या संकल्पनेतूनच ज्या महिला या त्यांच्या घरातील कचºयाचे ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून तो स्वतंत्र डब्यातून घंटागाडीत टाकतील, अशा नागरिकांचा सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको आरोग्य विभागाचे प्रमुख रमेश गाजरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, अशा महिलांचा नुकताच मनपा विभागीय कार्यालयात दक्ष महिला आरोग्य सेवा सन्मान  पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.पूर्वी नागरिक हे ओला व सुका कचरा हे एकत्रितच घंटागाडीत टाकत होते, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे मनपाने आता ओला व सुका कचºयाचे स्वतंत्र असे वर्गीकरण करावे याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले असून, यासाठी नवीन घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यास नागरिकांचाही सहभाग मिळत असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. सिडकोतील ज्या महिला घंटागाडीत ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून कचरा घंटागाडीत टाकतात अशा प्रत्येक प्रभागातून पाच महिलांचा मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी सुनीता कुमावत याच्या हस्ते ‘स्वच्छता दक्ष महिला आरोग्यसेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.  याप्रसंगी सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, राजेंद्र महाले, श्यामकुमार साबळे, राकेश दोंदे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, संगीता जाधव, संगीता आव्हाड, सिडको आरोग्य विभागाचे प्रमुख रमेश गाजरे, रवि जाधव, दीपक लांडगे यांसह स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.