शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय भाडेकरूंच्या माहितीबाबत घरमालक उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 19:37 IST

घोटी : वाडीवºहे, मुंढेगाव, गोंदे दुमाला, इगतपुरी, घोटी परिसरात इतर जिल्ह्यासह परप्रांतीय कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विस्तारत चाललेल्या गावांमध्ये भाड्याने देण्यात येणाऱ्या इमारती वाढत चालल्या असून त्याही सध्या कमी पडत आहे. सर्वच भाडेकरूबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देण्यास घरमालक टाळाटाळ करीत आहेत. परिणामी गुन्हेगारांचे उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनाच घरमालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे लागणार आहेत. पोलिसांनी याबाबत सूक्ष्म तपास सुरू केल्याचे समजते.

ठळक मुद्देइगतपुरी : तालुक्यात घरमालकांवर कठोर कारवाईचे संकेत

घोटी : वाडीवºहे, मुंढेगाव, गोंदे दुमाला, इगतपुरी, घोटी परिसरात इतर जिल्ह्यासह परप्रांतीय कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विस्तारत चाललेल्या गावांमध्ये भाड्याने देण्यात येणाऱ्या इमारती वाढत चालल्या असून त्याही सध्या कमी पडत आहे. सर्वच भाडेकरूबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देण्यास घरमालक टाळाटाळ करीत आहेत. परिणामी गुन्हेगारांचे उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनाच घरमालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे लागणार आहेत. पोलिसांनी याबाबत सूक्ष्म तपास सुरू केल्याचे समजते.इगतपुरी, वाडीवºहे, मुंढेगाव, गोंदे दुमाला, घोटी ह्या गावांसह परिसरात भाड्याने देण्यासाठी अनेकांनी इमारती उभारलेल्या आहेत. तालुक्यातील विविध कारखान्यांमध्ये परप्रांतीय कामगारांचे लोंढेच्यालोंढे वाढले आहेत. कमी पगारात अधिक काम करीत असल्यामुळे परप्रांतीय आणि बाहेर जिल्ह्यातील मजुरांना मागणी आहे. यामुळे ह्या मजुरांना राहण्यासाठी भाड्याने खोल्या देण्याचा धंदा तेजीत आलेला दिसतो. मात्र बहुसंख्य घरमालकांनी भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला दिलेली नाही. प्रचलित कायद्याप्रमाणे अशी माहिती बंधनकारक असूनही घरमालक टाळाटाळ करीत आहेत. भाडेकरूंच्या कुटुंबातील सर्वांचे आधारकार्ड, शिधा पत्रिका, मोबाईल क्र मांक, मूळ गावाची माहिती, भाडे करारनामा, फोटो अशी परिपुर्ण माहिती घेऊन पोलीस ठाण्यात देण्याचे घरमालकांना सक्तीचे आणि महत्वाचे असतांना देखिल घरमालकांनी त्याकडे दुर्लक्ष्य केले आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ह्या भागात सुरक्षितता वाटते आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.लहान लहान खोल्यांमध्ये परप्रांतीय कामगार जास्त भाडे देऊन राहत असल्याने मिळणाºया जास्त घरभाडयामुळे घरमालकही जास्त खोलात जात नाही ही वस्तुस्थिती आहे.प्रेमप्रकरणात पळून आलेल्या जोडप्यांचे ह्या भागात वास्तव्य दिसून आले आहे. एकाच भाड्यात तीन तीन परिवार दाटीवाटीने राहत असल्याचेही समजते. यासह बाहेर गैरप्रकार करणाºयांना भाडेकरू घरात घेऊन संरक्षित करतात.भाडेकरू नागरिकांबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात आवश्यक पुराव्यांसह घरमालकांनी माहिती देणे बंधनकारक आहे. नागरिकांच्याच सुरक्षिततेसाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. भाडेकरूंची माहिती न देणाºया घरमालकांवर आम्ही कारवाई करणार आहोत.- सुहास देशमुख,पोलीस निरीक्षक वाडीवºहे.अनेक परप्रांतीय भाडेकरू व्यसनाधीन आहेत. रोजची भांडणे करून सर्वांना त्रस्त करतात. यामुळे स्थानिक महिलांची सुरक्षितता वाºयावर आहे. घरमालकांनी याबाबत पोलिसांना सहकार्य केल्यास गुन्ह्यांना आळा बसू शकेल किंवा तपासाला नक्की मदत होवू शकते.- एक त्रस्त गृहिणी.