शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड्स कोरेानात बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:11 IST

वय वर्ष ५० असलेल्यांची कोरोनाच्या काळात विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यांना अधिक धोका असल्याने अशा होमगार्ड्स‌ना ड्युटी देण्यात ...

वय वर्ष ५० असलेल्यांची कोरोनाच्या काळात विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यांना अधिक धोका असल्याने अशा होमगार्ड्स‌ना ड्युटी देण्यात येऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास ३५० होमगार्ड्सना कोरोनाच्या काळात ड्युटी देण्यात आलेली नाही.

शहर, जिल्ह्यासह ग्रामीण तसेच आदिवासी भागापर्यंत होमगार्ड्सची सेवा महत्त्वपूर्ण ठरली आहे. होमगार्ड म्हणून सेवा करण्यासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून महिला, पुरुष नेांदणीकृत आहेत. जिल्ह्यात जवळपास तीन हजार इतके नोंदणीकृत होमगार्ड्स‌ असून प्राप्त परिस्थितीनुसार त्यांची सेवा घेतली जाते. जिल्ह्याचा एकूण विस्तार पाहता जवळपास अडीच हजार होमगार्ड्स‌ना पटावर घेतले जाते.

--इन्फो---

३०००

जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड्स‌

४७६

महिला होमगार्ड्स‌ची संख्या

३५०

५० पेक्षा जास्त वय असलेले

२४३८

सध्या सेवेत असलेले

--इन्फो--

७५ टक्के लसीकरण

जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड्स‌पैकी जवळपास ७५ टक्के होमगार्ड्स‌चे लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले असून, पहिला डोस पूर्ण करण्यात आलेला आहे. आता नव्या नियमानुसार त्यांना डोस ८४ दिवसांनंतर मिळणार आहे. काहींचा दुसरा डोस देखील झाला असण्याची शक्यता आहे. लसीकरणाच्या सूचना होमगार्ड्स‌ना देण्यात आलेल्या आहेत.

--इन्फो--

आम्ही जगायचे कसे?

होमगार्ड्स‌ची ड्युटी केल्यामुळे मिळणाऱ्या मानधनातून आर्थिक दिलासा मिळतो. त्यावर बरेच काही अवलंबून आहे. मात्र, आता ड्युटी दिली जात नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. लवकरात लवकर ड्युटी सुरू करावी, अशी अपेक्षा आहे. आता कोरोना नियंत्रणात आला आहे.

- रमाकांत वाघमारे, होमगार्ड

वय जास्त असल्याने कोरानाच्या काळात आम्हाला ड्युटी देण्यात आलेली नाही. शासनाने दखल घेऊन काळजी केली ही चांगली बाब आहे. मात्र, ड्युटी नसल्याने मोबदलाही मिळाला नसल्याने आर्थिक अडचण झाली आहे. ड्युटी नसणाऱ्या ५० वर्षांवरील होमगार्ड्स‌ना आर्थिक मदत दिली असती तर आधार झाला असता.

गोरख रणशूर, होमगार्ड