शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गृहखात्याचा कारभार : सेवाज्येष्ठता जाहीर होऊनही अन्याय पोलीस निरीक्षक पदोन्नतीत मागासवर्गीयांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 02:12 IST

नाशिक : सहायक निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी डावलणाºया राज्याच्या गृहखात्याने गेल्या आठवड्यात राज्यातील २९ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देताना मागासवर्गीय सहायक निरीक्षकांना डावलले.

ठळक मुद्दे सेवाज्येष्ठता अगोदर धरण्यात आलीसातत्याने गृहखात्याकडून अन्याय

नाशिक : सहायक निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी डावलणाºया राज्याच्या गृहखात्याने गेल्या आठवड्यात राज्यातील २९ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देताना मागासवर्गीय सहायक निरीक्षकांना डावलले असून, त्यामुळे अगोदर सेवाज्येष्ठता डावलल्या गेलेल्या पोलीस अधिकाºयांमध्ये आता पदोन्नतीतही डावलले गेल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये पदोन्नती दिली जात असल्याचे गृहखात्याने म्हटले असले तरी, त्यातून मागासवर्गीयांना पदोन्नती न देण्यामागचे कारण मात्र स्पष्ट केलेले नाही. पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीत सेवाज्येष्ठता डावलल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्याने त्याची दखल घेत गृहखात्याने सहायक पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी नव्याने तयार करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्टÑ पोलीस अकादमीतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्यांना डावलून दुसºया किं वा तिसºया प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्यांची सेवाज्येष्ठता अगोदर धरण्यात आली होती, परिणामी सेवाज्येष्ठतेमुळे पोलीस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी लवकर बढती देण्यात आली तर सेवाज्येष्ठता डावललेल्या अधिकाºयांवर अन्याय करण्यात आला होता. ज्यांची सेवाज्येष्ठता कमी होती, अशांना कालबद्ध पदोन्नतीनुसार पुन्हा पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली. त्यावर सेवाज्येष्ठता असूनही डावलले गेलेल्या अधिकाºयांनी तक्रार केल्यानंतर गृहखात्याने नवीन सेवाज्येष्ठता यादी तयार केली. दि. १७ फेब्रुवारी रोजी गृहखात्याने राज्यातील २९ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती दिली आहे. ही पदोन्नती देताना फक्त खुल्या प्रवर्गाचाच विचार करण्यात आला असून, सेवाज्येष्ठता असलेल्या मागासवर्गीय सहायक निरीक्षकांना त्यातून डावलण्यात आले आहे. त्यामुळे सातत्याने गृहखात्याकडून अन्याय होत असल्याची भावना या अधिकाºयांमध्ये निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सेवाज्येष्ठतेत डावलल्या गेलेल्या अधिकाºयांनी तक्रारी केल्यानंतर गृहखात्याने सेवाज्येष्ठता पडताळणीनंतर पदोन्नती देण्यात येईल, असे आश्वासनही या मागासवर्गीय अधिकाºयांना दिले होते, परंतु त्याचे पालन मात्र करण्यात आलेले नाही.