शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीत गृहखात्याचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:39 IST

नाशिक : महाराष्टÑ पोलीस अकादमीतून सन २००४ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण होऊन सेवाज्येष्ठतेनुसार सन २०११ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीही देण्यात आली, परंतु पोलीस उपनिरीक्षकपदी अनुत्तीर्ण होऊनही सेवाज्येष्ठतेत खालच्या क्रमांकावर असलेल्या सहायक निरीक्षकांना थेट पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा मोठा घोळ राज्याच्या गृहखात्याने घातला असून, त्यासाठी सोयीने सेवाज्येष्ठता यादीत फेरफार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देअनुत्तीर्णांना प्रमोशन उत्तीर्णांवर वाट पाहण्याची वेळ

नाशिक : महाराष्टÑ पोलीस अकादमीतून सन २००४ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण होऊन सेवाज्येष्ठतेनुसार सन २०११ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीही देण्यात आली, परंतु पोलीस उपनिरीक्षकपदी अनुत्तीर्ण होऊनही सेवाज्येष्ठतेत खालच्या क्रमांकावर असलेल्या सहायक निरीक्षकांना थेट पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा मोठा घोळ राज्याच्या गृहखात्याने घातला असून, त्यासाठी सोयीने सेवाज्येष्ठता यादीत फेरफार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गृहखात्याच्या या अजब कारभाराने राज्यातील आठ ते दहा सहायक पोलीस निरीक्षकांवर मोठा अन्याय झाला असून, सहा महिन्यांपूर्वी सदरचा घोळ गृहखात्याच्या निदर्शनास आणूनदेखील पदोन्नती देण्यात चालविलेली टाळाटाळ पोलीस अधिकाºयांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.नाशिक पोलीस अकादमीच्या सन २००४ च्या ९५, ९६ व ९७ सत्रात उत्तीर्ण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांना कालबद्ध पदोन्नतीने सहायक पोलीस निरीक्षक व त्यानंतर पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली असून, अशी पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादीला अधिक महत्त्व देणे अपेक्षित आहे. पोलीस उपनिरीक्षकांच्या पासिंग आउटच्या वेळी जो प्रशिक्षणार्थी प्रथम येतो त्यास सोल्ड आॅफ आॅनरचे पहिले बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते व तुकडीमध्ये त्यास प्रथम क्रमाकांची सेवाज्येष्ठता दिली जाते. जे प्रशिक्षणार्थी नापास होतात त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वेळेस संधी दिली जाते व सहा महिन्यांनंतर ते परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले नाही तर तिसरी संधी देण्यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागते व त्यानंतर ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना तुकडीतील सर्वांत शेवटची सेवाज्येष्ठता दिली जाते असे असतानाही सन २००४ च्या सत्र ९५च्या तुकडीतील ३४६ प्रशिक्षणार्थीपैकी ३२० प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण झाले व २६ प्रशिक्षणार्थी अनुत्तीर्ण झाले होते. असे असतानाही जे प्रशिक्षणार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांची सेवाज्येष्ठता मात्र उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या अगोदर दाखविण्यात आली. परिणामी जे प्रशिक्षणार्थी पहिल्या प्रयत्नातच पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण झाले त्यांना सेवाज्येष्ठतेत डावलण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अशोक सहादू गायकवाड व शेख अब्दुल माजिद अब्दुल कादर हे दोन पोलीस उपनिरीक्षक अनुत्तीर्ण झालेले असतानाही त्यांची सेवाज्येष्ठता उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या अगोदर दाखवून त्यांना सहायक निरीक्षक व तेथून थेट पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. याचाच अर्थ गृहखात्याने सेवाज्येष्ठता यादीत प्रचंड घोळ घालून पात्र अधिकाºयांवर अन्याय केला आहे.