शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साकोऱ्यात घरोघरी आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:18 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग तसेच शिक्षकांच्या वतीने गाव तसेच वाड्या-वस्तीवरील प्रत्येक घरोघरी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगावात अखंड हरीनाम सप्ताहामुळे कोरोनाच्या रुग्णांनी शतक गाठले होते.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग तसेच शिक्षकांच्या वतीने गाव तसेच वाड्या-वस्तीवरील प्रत्येक घरोघरी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.गेल्या महिन्यात साकोरालगत मुळडोंगरी या छोट्याशा गावात अखंड हरीनाम सप्ताहामुळे कोरोनाच्या रुग्णांनी शतक गाठले होते. त्यामुळे साकोरा गावात देखील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ३० ते ३५ रुग्णांची संख्या झाली होती.त्यासाठी आरोग्य विभाग व ग्रा.पं. प्रशासनाने या रुग्णांसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र एकही रुग्ण या ठिकाणी न जाता गावात फिरत असल्याने अधिक संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली होती. तसेच याच शाळेत प्रत्येक बुधवारी लसीकरण सुरू करण्यात आले असून आतापर्यंत गावातून ४९६ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विभाग, आशा सेविका व प्रा. शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांची बैठक घेऊन वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी गावात घर ते घर तपासणी मोहीम हाती घेतली आहे.त्यासाठी दोन शिक्षक, एक आशासेविका अशा एकूण आठ टीम बनवण्यात आलेल्या असून त्यांच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीचे पल्स रेट, ऑक्सिजन पातळी तसेच तापमानाची तपासणी केली जात आहे. याद्वारे संशयित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत