शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून घरांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण : नगर परिषदेच्या बैठकीत मालमत्ता कराविषयी महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी सिन्नरच्या मालमत्ताधारकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:53 IST

सिन्नर : मोकाट जनावरे पांजरपोळमध्ये जमा करणे, प्रारूप वाहतूक आराखडा मंजूर करणे या विषयांसह नगर परिषदेने मालमत्ता- धारकांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर केले.

ठळक मुद्देकर ३१ मार्चपूर्वी भरावा लागणारएकरकमी भरल्यास दंड माफ

सिन्नर : शहरातील मोकाट जनावरे पांजरपोळमध्ये जमा करणे, शहराचा प्रारूप वाहतूक आराखडा मंजूर करणे या विषयांसह नगर परिषदेने मालमत्ता- धारकांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय मासिक बैठकीत मंजूर केले आहेत. माजी सैनिकांना राहत्या घराची ५० टक्के घरपट्टी माफ करण्यासह मालमत्ताधारकांनी मुदतीत कर भरणा न केल्यास होणारा दंड माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगर परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. तथापि, घरमालकाला थकीत कर ३१ मार्चपूर्वी भरावा लागणार आहे. नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात बैठक पार पडली. उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, नगरसेवक शैैलेश नाईक, गोविंद लोखंडे, विजय जाधव, बाळासाहेब उगले, रुपेश मुठे, श्रीकांत जाधव, सोमनात पावसे, श्रीकांत जाधव, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, प्रणाली गोळेसर, सुजाता भगत, विजया बर्डे, सुजाता तेलंग, गीता वरंदळ, नामदेव लोंढे, रामनाथ लोणारे, शीतल कानडी, प्रतिभा नरोटे, नलिनी गाडे, मंगला शिंदे, संतोष शिंदे, मल्लू पाबळे, सुहास गोजरे, चित्रा लोंढे, मालती भोळे, अलका बोडके, प्रीती वायचळे, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास आदींसह विविध खात्यांचे प्रमुख बैठकीस उपस्थित होते.पालिकेची मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकबाकी आहे. ती वसूल होण्यासाठी कर व त्यावरील व्याज आकारणी ३१ मार्चपूर्वी एकरकमी भरल्यास दंड माफ करण्यात येणार आहे. माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट देण्याची अनेक वर्षांची मागणी होती. सुमारे ७५० स्क्वेअर फूट घरासाठी मालमत्ता करात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, माजी सैनिक प्रत्यक्षात त्या घराचा वापर करत असणे अनिवार्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ठरावास नगरसेवक नामदेव लोंढे यांनी पाठिंबा दिला. नवीन मिळकतींवर करात सवलतीसाठी अपील करताना ३० टक्के रक्कम दोन टप्प्यात भरण्याची सवलतही यावेळी देण्यात आली. शहरातील मोकाट जनावरांमुळे शहरातील वाढत्या अपघातांची समस्या दूर करण्यासाठी ही मोकाट जनावरे नाशिकच्या पांजरपोळमध्ये जमा करण्यास यापूर्वीच सभागृहाने मंजुरी दिली आहे. यापूर्वी नगरपालिकेने जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी संबधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, शहराच्या विविध भागात होर्डिंग्जही लावण्यात आले होते; मात्र त्यानंतरही मोकाट जनावरे कमी झाली नसल्याने तातडीने ही जनावरे पांजरपोळकडे जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे बैठकीत ठरले. नगरपालिकेने पांजरपोळशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारानंतर पांजरपोळकडे जनावर गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अशी तरतूद या करारात करण्यात आली असल्याकडे मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांनी लक्ष वेधले. नगरपालिकेच्या कोनांबे येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेतून समृद्धी महामार्ग जाणार असून, नगरपालिकेची ८१ गुंठे जागा त्यात जाणार आहे. ही जागा योग्य तो मोबदला घेऊन या महामार्गासाठी हस्तांतरित करण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली. मोबदल्यापोटी येणारी रक्कम विकासकामासाठी खर्च न करता पाणीयोजनेच्या कामासाठी खर्च करावी, अशी सूचना नामदेव लोंढे यांनी मांडली. ही पाणीपुरवठा योजना पुढील ५० वर्षांचा विचार करून राबविण्यात येत असून, पुढे विस्तारीकरणाला अडचण येऊ नये म्हणून मिळणाºया मोबदल्याच्या रकमेतून जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच जागा खरेदी करावी अथवा शासनाची एखादी जागा असल्यास मोबदल्याऐवजी ती जागा घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. या सूचनेला सभागृहाने मंजुरी दिली.