शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

बिबट्याने दिले दर्शन अन् शाळेला मिळाली सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:13 IST

नाशिकमधील पंचवटी शिवारातील मेरी परिसरात बिबट्याने दर्शन दिल्यामुळे चक्क येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना सोमवारची सुटी प्रशासनाने जाहीर केली

ठळक मुद्देसदर वार्ता ही अफवादेखील असू शकतेसोमवारी शाळा नियमीतपणे भरणार नसून पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवू नये, अशी पोस्ट व्हायरल शाळेची घंटा सकाळी वाजणार नाही, हे निश्चित असले तरी बिबट्याने मात्र दर्शन दिले की नाही? हे अद्याप निश्चित नाही.खात्रीशिर कु ठलेही नैसर्गिक पुरावे परिसरात वनविभागाला अद्याप आढळलेले नाहीरात्रीच्या वेळी परिसरात बाहेर एकटे पडू नये जंगलाच्या परिसरात जाऊ नये, खबरदारी घ्यावी

नाशिक : नाशिकमधील पंचवटी शिवारातील मेरी परिसरात बिबट्याने दर्शन दिल्यामुळे चक्क येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना सोमवारची सुटी प्रशासनाने जाहीर केली आहे.शहरातील म्हसरुळ जवळील मेरी भागात रविवारी दुपारनंतर काही रहिवाशांनी बिबट्या बघितल्याची अफवा परिसरात  पसरली. सदर वार्ता ही अफवादेखील असू शकते; कारण वनविभागाच्या कर्मचाºयांनी संपूर्ण परिसर दिवसभर पोलिसांच्या साक्षीने पिंजून काढला; मात्र कुठेही बिबट्याचे नैसर्गिक पुरावे आढळून आले नाही. सतर्कता म्हणून रात्री देखील दोन कर्मचारी दर चार तासाने परिसरात गस्तीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. रविवारी दुपारी मेरीच्या एका शाळेच्या जवळच बिबटया काही नागरिकांनी बघितल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने धोका नको म्हणून सोमवारी शाळा नियमीतपणे भरणार नसून पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवू नये, अशी पोस्ट, फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल केली. यामुळे सदर शाळेची घंटा सकाळी वाजणार नाही, हे निश्चित असले तरी बिबट्याने मात्र दर्शन दिले की नाही? हे अद्याप निश्चित झालेले नाही.दुपारनंतर बिबट्याने दर्शन दिल्याचे काही नागरिकांनी म्हणणे आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांनी मेरीजवळील तारवालानगर परिसरात खाणाखुना शोधण्यास सुरूवात केली. दिवसभर कर्मचाºयांनी परिसर पिंजला; मात्र खात्रीशिर कु ठलेही नैसर्गिक पुरावे परिसरात वनविभागाला अद्याप आढळलेले नाही. पहाटेदेखील परिसरात जे नागरिक दिसतील त्यांच्याशीही संवाद साधला जाणार आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये, रात्रीच्या वेळी परिसरात बाहेर एकटे पडू नये, अथवा हातात विजेरी अन् काठी घेऊन बाहेर यावे, मात्र जंगलाच्या परिसरात जाऊ नये, खबरदारी घ्यावी.- प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी