शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

होळीनिमित्त वीरांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:16 IST

होळीच्या दुसºया दिवशी होळीभोवती देव नाचवून त्यांना नदीत अंघोळ घालण्याच्या येथील पारंपरिक प्रथेप्रमाणे परिसरात मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराज, भोले शंकर, संभाजी महाराज, श्रीकृष्ण आदी देवांची वेशभूषा करून देव नाचविण्यात आले. इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी या मिरवणुका काढण्यात आल्या.

नाशिक : होळीच्या दुसºया दिवशी होळीभोवती देव नाचवून त्यांना नदीत अंघोळ घालण्याच्या येथील पारंपरिक प्रथेप्रमाणे परिसरात मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराज, भोले शंकर, संभाजी महाराज, श्रीकृष्ण आदी देवांची वेशभूषा करून देव नाचविण्यात आले. इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी या मिरवणुका काढण्यात आल्या. दारणा नदीपात्रात घरातील देव्हाºयातील देवांना यावेळी स्नान घालण्यात आले. यानंतर पुन्हा देव नाचवित ते घरोघरी आणण्यात आले. ढोलक हलगीच्या तालावर नृत्य करीत वीरांची निघालेली मिरवणूक हे होळी सणाचे आकर्षण ठरले. नांदूरवैद्यसह सर्वतीर्थ टाकेद, घोटी, वैतरणा आदी परिसरात या मिरवणुका काढण्यात आल्या. निकवेल : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात प्रत्येक गावात एक गाव एक होळी उत्साहात साजरी करण्यात आली.  पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, संवर्धन व जलसंवर्धन करणे गरजेचे आहे. यावर्षी होळीनिमित्ताने झाडांची तोड न करता होळी साधी व परिसरातील टाकाऊ लाकूड व गोवºया गोळा करून होळी साजरी करण्यात आली.  उपस्थिांमध्ये वि.वि.का. सोसायटी अध्यक्ष नीलेश वाघ, पोलीसपाटील विशाल वाघ, उपसरंपच मुरलीधर वाघ, वनकमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे, ग्रा.पं. सदस्य विजय वाघ, संजय सोनवणे, पोपट म्हसदे, किशोर वाघ, संजय सोनवणे, आबा अनारे, भिका वाघ, निवृत्ती धोंडगे व सर्व तरु ण मित्रमंडळ, सर्व स्वाध्याय परिवार व भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे आनंदाच्या वातावरणात विधिवत पूजन करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळी उत्साहात साजरी करण्यात आली.घोटी : इगतपुरी तालुक्यात पारंपरिक शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धूलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातून वीरांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच ग्रामीण भागातून आलेल्या युवा कलाकारांनी प्राण्यांची वेशभूषा करून जागोजागी नृत्य सादर केल्याने या कलाकारांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.  इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक होळी उत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील जंगलसंपत्ती नष्ट होत असल्याने अनेकांनी विकत लाकडे आणि गोवºया घेऊन होलिका दहन करून शिमग्याचा सण साजरा केला.  दरम्यान, शुक्रवारी धूलिवंदनाच्या दिवशी होळीला फेºया मारून वीर नाचविण्याची प्रथा आहे. ही प्रथा ग्रामीण भागाने जतन करीत विविध प्राण्यांच्या वेशभूषा करीत वीर नाचविले. ग्रामीण भागातून आलेल्या या कलाकारांनी अनेकांचे लक्ष वेधले.येवला : येथील डी.जी. रोडवरील नवभारत मित्रमंडळाच्या होळीची दीडशे वर्षांची परंपरा आहे. ही होळी पौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत चालू असते. पर्यावरण संतुलनासाठी अशी परंपरा मोडीत काढत आता फक्त रंगपंचमीपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे मित्रमंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष अविनाश कुक्कर यांनी सांगितले. मंडळाच्या वतीने  गपंचमीच्या दिवशी पारंपरिक वाद्य लावून याच चौकात सायंकाळी रंगाचे सामने खेळले जातात. संपूर्ण गावातील तालीम, मंडळ यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवितात. तसेच हे सप्तरंगाचे सामने बघण्यासाठी बाहेरगावाहून बरेच लोक येथे येतात. याच परिसरात होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.महाराष्टतील शिमगाहोळीला महाराष्टÑात शिमगा आणि दक्षिण भारतात कामदहन म्हटले जाते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा, होळी पूर्ण जळाल्यानंतर ती दुधातुपाने शिंपतात आणि तिला शांत करतात. मग जमलेल्या लोकांना नारळाचा प्रसाद म्हणून वाटप करतात. होळीची रात्र नाच-गाण्यात, गप्पागोष्टी करण्यात घालवतात. दुसºया दिवशी अश्लील बोलून रक्षा नदीत, समुद्रात किंवा तलावात विसर्जित करतात. काही ठिकाणी अंगाला राख फासून नृत्य, गायन करतात.परिसरातील नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, वंजारवाडी, गोंदे दुमाला, अस्वली स्टेशन, कुºहेगाव आदी ठिकाणी होळ्या करण्यात आल्या. या परिसरात होळी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. होळी सणाच्या निमित्ताने पाच दिवस परिसरात विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारची नृत्ये या दिवशी पहावयास मिळणार असल्याने परिसरातील सर्व नागरिकांना ही एक मनोरंजनाची मेजवानीच असणार आहे.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८