शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात शिवसेनेकडून नायलॉन मांजाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:50 IST

येवला : मकर संक्रांत उत्सवाच्या काळात येवला शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. त्यात घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होऊ नये आणि या मांजावर बंदी घालण्यासाठी येवल्यात शिवसेना व नागरिकांच्या वतीने सराफ बाजारात नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देआंदोलन : बंदी घालण्याची मागणी

येवला : मकर संक्रांत उत्सवाच्या काळात येवला शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. त्यात घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होऊ नये आणि या मांजावर बंदी घालण्यासाठी येवल्यात शिवसेना व नागरिकांच्या वतीने सराफ बाजारात नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.तीन दिवस चालणाऱ्या या ॅसंक्रांत उत्सवादरम्यान पतंग उडविणासाठी अधिक उत्तम दर्जाचा दोरा वापरण्यासाठी चढाओढ सुरू असते. संक्रात उत्सव हा येवल्यात शेकडो वर्षांपासून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पूर्वी पतंग उडविण्यासाठी लागणारा दोरा म्हणजेच मांजा हा मजबूत दोरा, चरस, काचेची भुकटी, रंग आदीचा वापर करून तयार केला जायचा. हा दोरा पतंग उडविण्यासाठी सर्वोत्तम मानला जायचा; परंतु गेल्या काही वर्षांपासून बाजारात नायलॉन मांजा विक्रीसाठी येऊ लागला आहे. कोणतेही कष्ट न करता तयार दोरा उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून त्याचा वापर होऊ लागला आहे. या घातक व न तुटणाºया या दोºयामुळे अनेक अपघात घडून पशुपक्ष्यांनादेखील आपला जीव गमवावा लागत आहे. अशा घातक मांजाची विक्री व वापर बंद करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मांजा विक्र ी करणारे व वापरणारे अशा दोघांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत शिवसेनेच्या वतीने येथील सराफ बाजारात नायलॉन मांजाची होळी करण्यात आली....अन्यथा आमरण उपोषणनायलॉन मांजाच्या विक्र ी व वापरावर बंदी न घातल्यास१४ जानेवारीपासून शहर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना येवला तालुका समन्वयक धीरजसिंग परदेशी, शेरू मोमीन, अमित अनकाईकर, अलताफ शेख, नितीन जाधव, आदम मोमीन, मोबीन खान, शाकीर खान, रूपेश घोडके, इब्राहीम सय्यद, सोमनाथ काथवटे, आशिष अनकाईकर, दीपक काथवटे आदींच्या स्वाक्षºया आहेत.