शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कृषी कायद्यांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत पंजाब व हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर २६ ...

नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत पंजाब व हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर २६ नोव्हेंबर २०२०पासून आंदोलन उभारले असून, या आंदोलनाला चार महिने पूर्ण होत असल्याचा पार्श्वभूमीवर किसान सभा व बहुजन शेतकरी संघटनेने शुक्रवारी (दि. २६) नवीन कृषी कायद्यांच्या प्रतीची होळी करून केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. तर काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत देशातील वाढत्या महागाईचा निषेध केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी देशभरात जनजागृती व्हावी आणि शेतकऱ्यांनी राष्ट्रीय आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी शुक्रवारी (दि. २६) भारतीय किसान मोर्चाने देशव्यापी बंदची हाक दिली होती. मात्र, या ‘भारत बंद’ला नाशिकमधील शहरी भागात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात शनिवारी आणि रविवारी बाजारपेठांमध्ये बहुतांश सर्वच व्यवहार बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सलग तीन दिवस बंद टाळण्यासाठी शुक्रवारी दुकाने व अन्य दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरू ठेवल्याने शहरी भागात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना काळात शेतकरी, कामगार, व्यापारीविरोधी कायदे केले असून, बँक, एल. आय. सी., रेल्वेचे खासगीकरण करून विक्री करत असल्याचा आरोप करत विविध शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र येत नाशिक रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नवीन कृषी कायद्याच्या प्रतीची होळी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सर्व आंदोलकांनी काँग्रेस कमिटीसमोरील धरणे आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष शरद आहेर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, राजू देसले, नगरसेवक समीर कांबळे, बबलू खैरे, उद्धव पवार, सुरेश मारू, स्वप्नील पाटील, हनिफ बशीर, रमेश पवार, विजय राऊत, बळवंत गोडसे, रौफ कोकणी, अनिल बहोत, जावेद इब्राहिमस इसाक कुरेशी, संजय पाटील, वंदना पाटील, भारती गीते, प्रमोद धोंगडे, सुमन महाले, गिरीष चौघुले, धनंजय कोठुळे तसेच शेतकरी आंदोलनाचे विराज देवांगे, नितीन मते, स्वप्नील धिया आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

इन्फो

काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व वाढत्या महागाईविरोधात शुक्रवारी (दि. २६) नाशिक शहर जिल्हा काॅंग्रेस कमिटीतर्फे सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत धरणे आंदोलन करत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याचप्रमाणे देशात सातत्याने महागाई वाढत असून, गॅस, पेट्रोल, डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव केंद्र सरकारने तत्काळ कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

===Photopath===

260321\26nsk_17_26032021_13.jpg~260321\26nsk_18_26032021_13.jpg

===Caption===

१) दिल्लीती शेतकरी आंदोलाच्या समर्थनार्थ  नाशिकमध्ये किसान सभा व बहूजन शेतकरी संघटनेतर्फे नवीन कृषी कायद्यांची होळी करण्यात आली. याप्रसंही अशोक पालकर, रमेश औटे, बळवंत गोडसे, नामदेव बोराडे आदी२) काँग्रेस कमिटी समोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करताना जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव, बबलु खैरे आदी~१) दिल्लीती शेतकरी आंदोलाच्या समर्थनार्थ  नाशिकमध्ये किसान सभा व बहूजन शेतकरी संघटनेतर्फे नवीन कृषी कायद्यांची होळी करण्यात आली. याप्रसंही अशोक पालकर, रमेश औटे, बळवंत गोडसे, नामदेव बोराडे आदी२) काँग्रेस कमिटी समोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करताना जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव, बबलु खैरे आदी