शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डसाठी श्रमजीवी संघटनेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:57 IST

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील सुमारे ४७८ आदिवासी बांधवांना रेशनकार्ड देण्यात यावे, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन ...

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील सुमारे ४७८ आदिवासी बांधवांना रेशनकार्ड देण्यात यावे, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आदिवासी बांधवांनी चार-पाच महिन्यांपूर्वी रेशनकार्ड मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केले होते. मात्र प्रशासनाने कोरोनासारख्या महामारीच्या काळात गोरगरिबांना वेठीस धरून शिधापत्रिकेपासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयावर बुधवारी श्रमजीवी संघटनेने धरणे आंदोलन केले. यादरम्यान जोपर्यंत रेशनकार्ड मिळत नाही तोपर्यंत फिजिकल डिस्टन्स ठेवून आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका संघटनेने घेतल्याने तालुका प्रशासनात धावपळ उडाली. आदिवासी गोरगरिबांना रेशनकार्ड मिळावे यासंदर्भात विवेक पंडित यांनी कोरोनाकाळात मजूर, शेतमजूर, हातावरचे पोट असलेल्या गोरगरिबांचे जगणे अवघड बनेल या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची दि. ३ एप्रिल रोजी सुनावणी होऊन पात्र वंचित आदिवासी अर्जदारांना शिधापत्रिका देण्यासाठी अवगत करण्यात आले होते.तालुका प्रशासनाने अर्जदारांना तत्काळ प्रभावाने रेशनकार्ड वाटप केले, तर यापूर्वी मागणी केलेल्या अर्जदारांना रोज एक गाव याप्रमाणे कार्ड तयार करून प्राधान्य शिक्का मारून वंचितांना रेशनकार्ड देण्यात येईल, असे आश्वासन नायब तहसीलदार बोडके व पुरवठा अधिकारी टर्ले यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. वारंवार हेलपाटे मारूनही रेशनकार्ड मिळाले नाही. यावेळी प्रत्यक्ष मिळाल्याने आदिवासी गोरगरिबांच्या अंगी उत्साह संचारला आणि तहसील आवारातच पावरीनृत्य करून आपला आनंद साजरा केला. यावेळी तालुक्यातील उंबरदे, माणी, देवमाळ, थविलपाडा, चिकाडी, कुकुडमुंडा, उंबरपाडा, अंबाडादहाड, गाळबारी, दुर्गापूर, मोठा तळपाडा, मनखेड आदी गावातील वंचितांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक