शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नोंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By admin | Updated: April 21, 2017 23:49 IST

नांदगाव : तलाठ्याच्या नोंद न टाकण्याच्या जाचामुळे लक्ष्मीनगरचे शेतकरी बापूसाहेब जाधव यांच्यावर बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे

नांदगाव : तलाठ्याच्या नोंद न टाकण्याच्या जाचामुळे लक्ष्मीनगरचे शेतकरी बापूसाहेब जाधव यांच्यावर बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला असून, तहसीलदार ते तलाठी व बँक यांचे उंबरे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या जाधव यांनी आता जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी साकडे घातले आहे. नोंदीसाठी तलाठ्याने पैसे मागितले, ही जाधव यांची तक्र ार आहे. बापूसाहेब जाधव यांनी २५ एप्रिल २०१६ रोजी खरेदी केलेल्या जमिनीची ८ ड ची नोंद करण्यासाठी तलाठी आर. यू. देशमुख गेले वर्षभर टाळाटाळ करत असून, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांचा आदेशही त्यांनी धुडकावून लावला आहे. एवढेच नव्हे तर नोंद होण्याआधीच खोटा ७/१२ चा उतारा जाधव यांना देऊन फसवणूक केली आहे. गेल्या महिन्यात तहसीलदार देवगुणे यांच्याकडे जाधव यांनी कैफियत मांडली. त्यावेळी देवगुणे यांना दोन दिवसात नोंद करून देतो असे सांगून तलाठी देशमुख यांनी सुटका करून घेतली. मात्र महिना उलटून गेला तरी नोंद केली नाही. तहसीलदारांच्या आदेशाची ही अवस्था आहे तिथे सामान्यांना न्याय कसा मिळावा.जाधव यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामासाठी त्यांना पीककर्ज घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर महसुली अन्याय होत आहे. याविरुद्ध उपोषणास बसण्याची जाधव यांची तयारी आहे. या सर्वांचा परिणाम प्रकृती स्वास्थ्यावर झाला असून, जिवाचे कमीजास्त झाल्यास तलाठी जबाबदार राहतील, असा इशारा जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केला आहे. (वार्ताहर)