शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीने घडविला इतिहास

By admin | Updated: February 1, 2017 00:39 IST

दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीने घडविला इतिहास

इतिहास चाळतानानाशिकमध्ये महापालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी वातावरण तापल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये उत्साह संचारला. पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे इच्छुकांना घुमारे फुटले. या निवडणुकीत महापालिकेचे ८७ प्रभाग (वॉर्ड) झाले होते. म्हणजे दोन प्रभाग वाढले होते. महापालिकेचे आकर्षण वाढल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी काहीही करण्याची तयारी दर्शविली. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस हा प्रमुख पक्ष असला तरी देशात आणि राज्यात भाजपा सेनेची सत्ता आली होती. त्याचा एकूणच नाशिकच्या राजकारणावर परिणाम झाला. पहिल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती नव्हती. भाजपाच्या दहा तर शिवसेनेच्या अवघ्या नऊ जागा होत्या. परंतु नंतर वातावरण बदलले होते. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती झाली. अनुकूल वातावरण त्यामुळे अधिकच पथ्यावर पडले आणि नाशिक महापालिकेत शिवसेना- भाजपाचे ४४ नगरसेवक निवडून आले. कॉँग्रेसला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत अनेक खांदेपालट आणि धक्कादायक पराभव- विजय झाले. नाशिकचे प्रथम महापौर शांतारामबापू वावरे यांचा पराभव हा सर्वाधिक धक्कादायक होता. प्रभाग क्रमांक ८३ मध्ये वावरे यांचा पराभव केला तो त्यांचे शागिर्द असलेले हरीभाऊ लोणारी यांनी. ४९८ मतांनी म्हणजे अल्प मतांनी हा धक्का होता. लोणारी यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. लोणारी हे जायंट किलर ठरले. भाजपाचे ज्येष्ठ बंडोपंत जोशी यांचा प्रभाव क्षेत्र असलेला भागच अन्य भागाला जोडला गेल्याने ते निवडून येऊ शकले नाही. माजी महापौर पंडितराव खैरे यांनी निवडणूक न लढविता, त्यांचे कनिष्ठ बंधू शाहू खैरे यांना निवडून आणले. महापालिकेच्या सेवेत असलेले शाहू खैरे यांनी सेवेचा राजीनामा देऊन निवडणूक लढविली.- संजय पाठक