शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

...अन् उजळला आर्टिलरीचा इतिहास

By admin | Updated: December 4, 2015 23:06 IST

...अन् उजळला आर्टिलरीचा इतिहास

पंकज पाटील, उपनगरतोफा आणि रणगाड्यांच्या आवाजाने युद्धभूमीचा थरार. आणि सैन्याच्या देदीप्यमान कामगिरीचा इतिहास प्रकाशमान करणारा सोहळा आर्टिलरीच्या मैदानावर उजळून निघाला. लाइट शो आणि रंगारंग लेझर किरणांनी आर्टिलरीच्या शौर्याची गाथा प्रकाशमान झाली. निमित्त होते तोफखाना केंद्राच्या तेराव्या रियुनियन सोहळ्याच्या समारोपाचे.रंगीत दिव्यांचा गणवेश परिधान केलेल्या एलईडी बॅण्ड पथकाचे संचलन, एलईडी स्क्रीनवर दृश्य स्वरूपात तोफखाना केंद्राचा संपूर्ण इतिहास, तोफखाना दलात आतापर्यंत सेवा बजावलेल्या विविध तोफांचे, चित्ररथांचे दर्शन या सोहळ्यात घडले. प्रमुख अतिथी म्हणून जनरल पी. आर. शंकर, जनरल एस.एफ. रॉड्रीक्स, पूर्व सेना अध्यक्ष जनरल दीपक कपूर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्टिलरी सेंटर नाशिकरोड व हैदराबादच्या रंगीत दिव्यांचा गणवेश परिधान केलेल्या एलईडी बॅण्ड पथकाने संचलन करत उपस्थितांना मानवंदना दिली.

सहभागी झालेल्या तोफांचे चित्ररथग्यानी स्टेडियमवर झालेल्या १३ व्या रियुनियन सोहळ्याच्या समारोपप्रसंगी सिक्स फाऊंडर गन, २.७ इंच बीएमएल गन, ३.७ इंच हॅवेत्झर गन, ४.२ इंच मॉर्टर गन, ७५ पॅक हॅवेत्झर गन, १३0 एमएम एमआरएल गन, १२२ एमएम रॉकेट लॉन्चर, १0५ एमएम लाईटवेट गन, ५५५ बोफोर्स गन इत्यादी तोफांचे चित्ररथ मैदानावर सादर करण्यात आले.

   कार्यक्रमादरम्यान संपूर्ण मैदानावर ब्लॅकआउट करण्यात आले होते. मैदानावर मध्यभागी बसविलेल्या २0 बाय ४0 फूट एलईडी स्क्रीनवर तोफखाना केंद्राचा संपूर्ण इतिहास दृश्य स्वरूपात दाखविण्यात आला. तसेच यावेळी भारतीय तोफखाना दलात आतापर्यंत सेवा बजावलेल्या विविध तोफांचे, चित्ररथांचे दर्शन उपस्थितांना झाले. संपूर्ण अंधारात झालेल्या या आकर्षक रियुनियन सोहळ्यात जवानांनी सादर केलेल्या युद्ध प्रसंगामुळे उपस्थितांच्या अंगात चैतन्य संचारले होते. ब्रिगेडीयर रोहित बुटालिया, ब्रिगेडीयर पी.आर. मुरली, मेजर जे.एस. बेदी यांचे सहकार्य लाभले.