शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

ऐतिहासिक भाजी मार्केटची दुरवस्था

By admin | Updated: June 29, 2017 00:25 IST

येवला : पालिकेने तयार केलेल्या मार्केटऐवजी बाहेर रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असल्यामुळे रस्त्यावरच बाजार थाटला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पालिकेने तयार केलेल्या मार्केटऐवजी बाहेर रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असल्यामुळे रस्त्यावरच बाजार थाटला जात आहे. यामुळे येथील शनिमंदिराजवळ कायम वाहतुकीची कोंडी होत आहे. यातून अनेकवेळा वाहनचालक व नागरिकांत बाचाबाची व भांडणासारखे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी नगरपालिकेने मोठा खर्च करून या भागाचे काँक्रिटीकरण केले आहे. पण त्याचा सदुपयोग होत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्यावर भरणारा भाजीबाजार केशवराव पटेल मार्केटमध्ये स्थलांतरित करावा, जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच शनि पटांगणाचे महत्त्वसुद्धा टिकून राहील, अशी मागणी येवलेकरांकडून केली जात आहे. शनि पटांगणावर अतिक्रमण करून मनमानी पद्धतीने भाजीविके्रते आपली दुकाने थाटत आहेत. मालक एक दुकाने चार अशी परिस्थिती आहे. बाहेर रस्त्यावर अनेक भाजीविके्रत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मध्यवस्तीत भाजीपाला मार्केट असावे तसेच गावाच्या संस्कृतीसंवर्धनासाठी मोठे सभागृह असावे या हेतूने येवला पालिकेने मोठा खर्च करून स्वर्गीय केशवराव पटेल भाजी मार्केट बांधले आहे. मात्र ते वापराविना पडून आहे. अवघा भाजीबाजार शनि पटांगणावर येऊन मोजके ५ ते ७ भाजीपालाविक्रे ते येथे बसतात. मार्केटची उर्वरित जागा मोकाट जनावरांचे आरामाचे ठिकाण झाले आहे. तसेच गांजा ओढणारे व इतर नशेखोरांची येथे वर्दळ दिसून येते. याबाबत पालिका काही कार्यवाही करील काय? या मार्केटमध्ये पुन्हा भाजीपाला विक्र ी सुरू होऊन गतवैभव प्राप्त करून देईल काय, असा प्रश्न विचारला जात आहे.येवला शहरात भाजीबाजारासाठी स्वर्गीय केशवराव पटेल मार्केटची बांधणी तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय प्रभाकरदादा कासार यांच्या काळात झाली. महाराष्ट्रात नंबर एकचे मार्केट तयार होऊन शहराला एक नवे वैभव प्राप्त झाले होते. मात्र ते वैभव फार काळ टिकले नाही.  गेल्या अनेक वर्षांपासून शहरात भाजी मार्केटची व्यवस्था असतानाही शनि पटांगण परिसरातच मोठ्या प्रमाणावर भाजीबाजार भरत आहे. यामुळे ऐतिहासिक शनिपटांगणाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत येथे भाजीबाजार भरतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा या पटांगणावर झाल्या आहेत. शहरात सभेसाठी एवढेच एक मैदान शिल्लक आहे. भाजीबाजार झालेल्या या ऐतिहासिक शनि पटांगणाला आता मोकळा श्वासदेखील घेता येत नाही ही सध्यस्थिती आहे. यासाठी या मार्केटमध्ये, स्वच्छता करणे, रंगरंगोटी करणे आणि भाजीपाला विक्रेत्यांना सक्तीने मार्केटमध्येच भाजीपाला विक्रीसाठी बसवणे या गोष्टी करणे पालिकेला इच्छा असली तर सहज शक्य आहे. या मार्केटच्या वरच्या बाजूला मोठे सभागृह आहे. परंतु त्याचा वापर होत नाही.१ मार्केटमध्ये विक्रेत्यांसाठी मोठे ओटे व माल ठेवण्यासाठी जागा बांधून देण्यात आली आहे. परंतु हे मार्केट वापराविना पडून आहे. अनेक भाजीपाला व्यापारी थेट शनि पटांगण गाठत आहे. पटांगणावर सायंकाळी उशिरापर्यंत बाजार भरलेला असतो. भाजी मार्केटच्या जागा भाडे वसुलीचा ठेका पालिकेने खासगी ठेकेदाराला दिला आहे. भाजीपाला विक्रेत्या-कडून वसुली केली जाते. परंतु त्यांनी नेमके कुठे, कसे बसावे? याला काहीच बंधने नाहीत. येथे भाजीपाला घेण्यासाठी आलेला ग्राहक रस्त्यावर गाडी लावून भाजीपाला खरेदी करतो. परंतु त्याच्या या वागण्याने वाहतुकीचा खोळंबा येथे निर्माण होतो. सध्या सर्व्हे नंबर ३८०७ आणि ३८०८ मध्ये पालिकेचे मोठे काम चालू आहे. यामुळे लक्कडकोट देवीमार्गे शहरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहतुकीचा सारा भार याच रस्त्यावर येतो. २ मंगळवारी भरणारा बाजार आता शहराला विळखा घालतो. कारण बुरु ड गल्लीपर्यंत भरणारा बाजार आता डी.जी.रोडपर्यंत पोहचला होता. तसेच शिंपी गल्लीपर्यंत भरणार बाजार आता पटणी गल्लीपर्यंत भरायला सुरु वात झाली होती. परंतु जागृत नागरिक अ‍ॅड.हाबडे यांनी न्यायालयीन लढाई लढून ही समस्या दूर केली.