शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात महिलांचा ऐतिहासिक प्रवेश

By admin | Updated: April 22, 2016 01:41 IST

नारीशक्तीचा विजय : ग्रामस्थांचा गाव बंद करून निषेध

 त्र्यंबकेश्वर : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शनैश्चर देवस्थानच्या विश्वस्तांनी शनि चौथरा महिलांसाठी खुला करून दिल्याने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळवण्यावरून निर्माण झालेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्ष वनिता गुट्टे यांच्यासह चार महिलांनी मंदिराच्या गर्भगृहात ऐतिहासिक प्रवेश करून दर्शन घेतले. गर्भगृहात चौथ्यांदा प्रवेश फसल्यानंतर आज स्वराज्य संघटनेला मंदिरात जाण्यास यश मिळाले. शनि मंदिरात महिला प्रवेशाचा लढा चालू असताना त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याची मागणी जोर धरू लागली होती. स्वराज्य संघटनेच्या महिला यासाठी प्रयत्नशील होत्या. मात्र मंदिर प्रशासन आणि स्थानिक भाविकांचा त्यांंना प्रवेश देण्यास विरोध होता. दरम्यान, महिलांनी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी त्र्यंबकेश्वर बंदची हाक दिली होती.स्वराज्य महिला संघटनेच्या वनिता गुट्टे व त्यांच्या सहकारी महिलांना गर्भगृहात जाण्यासाठी रोखण्यात आले. या प्रयत्नात त्यांच्या वाट्याला मारहाण, अपमानास्पदरीत्या बाहेर काढणे आदि प्रसंग आले. पाचव्या प्रयत्नात पोलिसांच्या मदतीने महिलांनी ऐतिहासिक प्रवेश केला. ही मागणी सर्वप्रथम भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली होती. त्र्यंबकेश्वरलादेखील त्या दोन वेळा येऊन गेल्या; पण त्यांना कडव्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतरच्या काळात उच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार स्वराज्य महिला संघटनेच्या वनिता गुट्टे व त्यांच्या सहकारी महिलांना चार वेळा गावकऱ्यांचा कडवा विरोध सहन केला. या काळात दि. १५ एप्रिल रोजी त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात फिर्यादही दाखल केली. यामध्ये देवस्थान न्यासचे सीसीटीव्हीचे फुटेज व पोलिसी कॅमेऱ्याचे फुटेजवरुन सुमारे २५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दि. १९ एप्रिल रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी विश्वस्त, पुरोहित संघ, नगरसेवक व ग्रामस्थांची बैठक त्र्यंबक पोलिस ठाण्यात घेतली. या पार्श्वभुमीवर गुरूवारी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त होता. रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, महिला पोलिस आदिंसह ५० ते ६० पोलिस जवानांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी वनिता गुट्टे व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी मंदिराचा उंबरा ओलांडून गर्भगृह प्रवेश केला. (वार्ताहर)