मालेगाव कॅम्पात चर्चगेट भागात मेहता कंपाऊंडवर ही घटना घडली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश असल्याने तिघा संशयितांनी एका सहकाऱ्याच्या वाढदिवशी गर्दी जमवून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला. यावेळी स्टीलच्या धातूची अंदाजे अडीच फूट लांबीची पितळी धातूची नक्षीदार मूठ असलेली व दोन फूट लांबीचे धारदार पाते असलेली जुनी तलवार घेऊन वाढदिवसाचा केक कापण्यात आला. पोलिस नाईक नंदू रतन पवार यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत संजय अहिरे (२२) रा. कलेक्टरपट्टा संगमेश्वर , उमेश बाळकृष्ण हिरे (२२) रा. पाटीलवाडा, संगमेश्वर आणि गिरीश अनिल निकम रा. जुने मानवपार्क यांचे विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली तर गिरीश निकम फरार झाला आहे. यावेळी चार पाच जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.
वाढदिवशी तलवारीने केक कापण्याचा फंडा भोवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST