शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

गुढीपाडवा यात्रोत्सवासाठी पदयात्रा

By admin | Updated: March 23, 2017 00:27 IST

वावी : श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गुढीपाडव्याला भरणाऱ्या कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी वावी (ता. सिन्नर) येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वावी : श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गुढीपाडव्याला भरणाऱ्या कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी वावी (ता. सिन्नर) येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी गुरुवारपासून (दि. २३) पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रोत्सवासाठी गुरुवारी वावीपासून नाथभक्तांचे पायी दिंडीद्वारे प्रस्थान होणार आहे.  वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराज यांचा यात्रोत्सव श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमी व गुढीपाडव्याच्या दिवशी भरतो. रंगपंचमी व गुढीपाडवा अशा दोन्ही यात्रोत्सवासाठी दरवर्षी येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. रंगपंचमीला झालेल्या यात्रेसाठी येथून नाथभक्त पायी दिंंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गेले होते. आता गुढीपाडव्याला होणाऱ्या यात्रोत्सवासाठीही गुरुवार (दि. २३) ते मंगळवार (दि. २८) पर्यंतच्या या पदयात्रेची तयारी सुरू असून, यात्रोत्सवात सहभागी होणारा रथ सजविण्यात आला आहे. पदयात्रेसाठी युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे.  गुढीपाडवा यात्रोत्सवासाठी गेल्या नऊ वर्षांपासून पदयात्रेत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोणी, कोल्हार, सोनई, शनिशिंंगणापूर, टाकळीमियाँ, मिरी, तिसगाव यामार्गे जाणाऱ्या पदयात्रेत भक्त दररोज ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. या पदयात्रेसोबत पिण्याच्या पाण्याचा टँकर, ट्रॅक्टर, टेम्पो आदि वाहने असतात.बुधवार (दि. २२) रोजी येथील कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणात रथ, ध्वज व पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी (दि. २३) सायंकाळी दिंडीचे प्रस्थान होईल.पदयात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे. (वार्ताहर)