शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:12 IST

शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर होणारे अपघात पाहता पंचवटी रस्ते अपघातात अग्रेसर राहिला आहे.

ठळक मुद्देरस्ते अपघातात पंचवटी अग्रेसर : तारवालानगर चौफुली बनली धोकादायक

पंचवटी : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर होणारे अपघात पाहता पंचवटी रस्ते अपघातात अग्रेसर राहिला आहे.औरंगाबादरोड, जुना आडगावनाका, निमाणी बसस्थानकासमोर वाहतूक कोंडी होत असली तरी त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने अपघातावर नियंत्रण कसे मिळविणार? असा प्रश्न नागरिक करत आहेत.नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील तारवालानगर चौफुलीवर होणाºया अपघातावर नियंत्रण बसावे यासाठी काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. परंतु अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहनधारकांच्या चुकीमुळे अपघात घडले आहेत. अपघातावर नियंत्रण यावे म्हणून स्वयंचलित सिग्नल पाठोपाठ गतिरोधक बसविण्यात आले, परंतु त्याचाही फारसा उपयोग झालेला नसून, महिन्याभरात डझनपेक्षा जास्त अपघात तारवालानगर चौफुलीवर घडले आहेत.या चौफुलीवर शहर वाहतूक पोलीस कर्मचारी हजर असेपर्यंत चालक वाहतूक नियम पालन करतात, त्यानंतर मात्र पुन्हा ‘जैसे थे’. मुंबई- आग्रा महामार्गावर गेल्या वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक सर्व्हिसरोडने वळविण्यात आली आहे, त्यात वेगाने जाण्याच्या प्रयत्नात चारचाकी एकमेकांना धडकून अपघात घडत असून, या रस्त्यावर अलीकडे दिवसाला एक अपघाती मृत्यू असे समीकरण तयार झाले आहे. अशीच परिस्थिती नाशिक-औरंगाबादरोडवर असून, या रस्त्यावर मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. त्यामुळे लग्नसराईत औरंगाबादनाका उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी होते. आडगाव नाका, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, निमाणी, हिरावाडी या चारही मुख्य रस्त्याला उपरस्ते येऊन मिळत असल्याने दररोज सायंकाळी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.सिग्नल यंत्रणा कुचकामीमुख्य वाहतूक चौफुलीवर वारंवार होणाºया अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक वाहतूक रस्त्यावर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली असली तरी, ‘अतिघाई संकटात नेई’ याप्रमाणे चालक वेगाने जाण्याच्या प्रयत्नात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहने नेतात आणि त्यामुळे अपघात घडतात. त्यामुळे चौफुलींवर कायम वाहतूक पोलीस नेमले पाहिजे, तर चौफुली सुरू होण्यापूर्वी किमान शंभर मीटर अंतरावर पुढे अपघात स्थळ आहे किंवा धोकादायक चौफुली असल्याने वाहने हळू चालवा, असे फलक लावणे गरजेचे आहे. पंचवटी परिसरातील मखमलाबादनाका, काट्या मारुती चौक, औरंगाबाद नाका, तारवालानगर, सेवाकुंज, पेठरोड बाजार समिती चौक भागात प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील अनेक सिग्नल बंद आहेत, तर अनेक सिग्नलवर वाहतूक पोलीस नसतात त्यामुळे सिग्नल नावपुरतेच असल्याचे बोलले जाते.स्पीड हम्पद्वारे नियंत्रणतारवालानगर चौफुलीवर वारंवार होणाºया अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी गतिरोधक बसविले होते, मात्र गतिरोधकामुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने सकाळी बसविलेले गतिरोधक काही तासांत काढून टाकण्यात आले होते. आता काही दिवसांपूर्वी पालिकेने स्पीड हम्प टाकले असले तरी या स्पीड हम्पवर अर्धवट पांढरे पट्टे मारलेले असल्याने ते वाहनधारकांना व्यवस्थित दिसत नाही त्यातच या स्पीड हम्पमुळे आणखी अपघाताची शक्यता असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा