शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाची वाढीव निविदा संशयात दहा हजार स्क्वेअर फूटचा उच्चांक : चौकशीचा फेरा

By admin | Updated: February 5, 2015 22:53 IST

विमानतळाची वाढीव निविदा संशयात दहा हजार स्क्वेअर फूटचा उच्चांक : चौकशीचा फेरा

  नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या चौकशीबरोबरच ओझर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या कामाचीही लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, सदर टर्मिनल इमारतीच्या बांधकामाची वाढीव निविदा व त्या अनुषंगाने ठेकेदाराला अदा केलेले देयके व बांधकामाची चौकशी करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. ओझर विमानतळाच्या ज्या आवारात ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना ‘मद्यपार्टी’ दिली त्या विमानतळाच्या टर्मिनल इमारत बांधकामाची चारपटीने निविदा वाढण्यामागच्या कारणांचीही यानिमित्ताने आता बांधकाम क्षेत्रात चर्चा होत असून, बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हर्ष कन्ट्रक्शनने जवळपास दहा हजार रुपये स्क्वेअर फूट दराने पैसे वसूल केल्याची परतफेड म्हणूनच त्याच ठिकाणी पार्टी देऊन ठेकेदार उतराई झाल्याचे बोलले जात आहे. टर्मिनल इमारतीच्या बांधकामाची पहिली निविदा अवघ्या २२ कोटी रुपयांची असताना त्यात पुन्हा कामात फेरबदल झाल्याचे दाखवून हर्ष कन्ट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती ४७ कोटीपर्यंत नेली व त्यानंतर फायनल देयक ९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातूनच ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हर्ष कन्ट्रक्शनला बांधकाम खात्याने थेट १७ कोटी रुपयांचे देयक अदा केल्याचीही माहिती आता पुढे आली आहे. विशेष म्हणजे अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या कारकिर्दीतच हर्ष कन्ट्रक्शनवर मेहेरबानी झाल्याने आता मद्यपार्टीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या चौकशीत या साऱ्या गोष्टींवर पुन्हा प्रकाशझोत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील जाणकारांच्या मते टर्मिनल इमारतीचे संपूर्ण काम ९० हजार स्क्वेअर फूट इतके असून, त्यापोटी ठेकेदाराला अदा करण्यात आलेले देयक पाहता, बांधकामाचा दर दहा हजार रुपये स्क्वेअर फूट इतक्यापर्यंत पोहोचला. नाशिक व मुंबईतदेखील कोणत्याही उच्चप्रतिच्या बांधकामाचा दर दहा हजार स्क्वेअर फूटापर्यंत पोहोचला नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीशिवाय हे सारे शक्यच नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यादृष्टीनेही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.