शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक ४०९९ रुग्ण; नऊ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:36 IST

नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंख्येने जिल्ह्यात प्रथमच ४ हजारांचा तर शहरात २ हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ४०९९ रुग्ण बाधित आढळले असून नाशिक शहरातही २०९० रुग्ण बाधित आढळले आहेत.

नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंख्येने जिल्ह्यात प्रथमच ४ हजारांचा तर शहरात २ हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ४०९९ रुग्ण बाधित आढळले असून नाशिक शहरातही २०९० रुग्ण बाधित आढळले आहेत. तर जिल्ह्यात ९ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२८३ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २६) ४०९९ बाधित रुग्ण तर २१५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दऱम्यान नाशिक मनपा क्षेत्रात ४, ग्रामीणला ४ तर जिल्हा बाह्य १ असे एकूण ९ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२८३ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून तर कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने दोन हजारांवर राहिल्यानंतर बुधवारी तीन हजार पार तर गुरुवारी तीन हजारांनजीक होती.शुक्रवारी बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित निघत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेलादेखील चिंता लागून आहे.गतवर्षीपर्यंत कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या ही २०४८ होती. म्हणजेच गतवर्षातील सप्टेंबर महिन्याच्या उच्चांकी संख्येच्या दुप्पट कोरोना रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत.नाशिक मनपा क्षेत्रात प्रथमच २ हजारपारनाशिक महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारच्या एकाच दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक २०९० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरातदेखील सातत्याने हजार, बाराशेपेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी सापडण्याचा प्रकार प्रथमच घडून येत आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.प्रलंबित साडेपाच हजारदिवसाला तीन-चार हजारांचे अहवाल बाधित तर तितकेच अहवाल निगेटीव्ह येत असूनही प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा साडेपाच हजारांहून अधिक म्हणजे ५५१७ वर पोहोचली आहे. त्यामुळे आठवडाअखेरपर्यंत बाधितांची संख्या कायम राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, ही वाढ अशीच कायम राहिल्यास प्रशासनाला पुढील महिन्यात विविध पर्यायाचा अवलंब करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या