शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हात परीक्षेची ‘शिक्षा’

By admin | Updated: June 30, 2014 00:57 IST

भर उन्हात परीक्षेची ‘शिक्षा’

 

नाशिक : पोलीस भरतीप्रक्रियेत शारीरिक चाचणीत मुंबई आणि पुणे येथे सुमारे सात उमेदवारांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच आणि या भरतीप्रकरणी गृह खात्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले असतानाही पोलीस प्रशासनाने त्यापासून काहीच बोध घेतला नसल्याचे उदाहरण नाशिकमध्ये प्रत्ययास आले असून, रविवारी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने पोलीस भरतीची लेखी परीक्षा भर उन्हात घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. लेखी परीक्षेसाठी पहाटेपासूनच कवायत मैदानावर दाखल झालेल्या ३,६५० उमेदवारांना भर दुपारी टळटळीत उन्हात आणि धुळीचा त्रास सहन करत परीक्षेची शिक्षा भोगावी लागली. शहर पोलीस आयुक्तालयाकडून २२ जून रोजी मैदानी चाचणीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्याचवेळी लेखी परीक्षेची तारीखही घोषित करण्यात आली होती. त्यानुसार ४७१ जागांसाठी ४,२८१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. या सर्व उमेदवारांना रविवारी (दि. २९ जून) सकाळी ६ वाजता कवायत मैदानावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज पहाटेपासूनच लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची गर्दी कवायत मैदानावर झाली. परीक्षेपूर्वी उमेदवारांना चेस्ट नंबर दिले जाणार होते. उमेदवारांना मैदानाबाहेरील आवारात बसविण्यात आले. तोपर्यंत परीक्षेचे नियोजन करणारे आणि बंदोबस्ताला असणारे कर्मचारी कवायत मैदानावर हळूहळू दाखल होत होते. या कर्मचाऱ्यांची हजेरी आटोपल्यानंतर उमेदवारांना चेस्ट नंबरसाठी पाचारण केले जाऊ लागले. मात्र, चेस्ट नंबर देऊन मैदानात प्रवेश देणे सोयीस्कर असताना पोलीस प्रशासनाकडून उमेदवाराचे हॉल तिकीट, ओळखपत्र आणि नंतर चेस्ट नंबर अशी वेळखाऊ प्रक्रिया राबविली गेली. परिणामी, एका उमेदवारासाठी सुमारे पंधरा मिनिटांचा वेळ खर्ची पडला. परीक्षेसाठी प्रत्यक्षात ३,६५० उमेदवार हजर झाले होते. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा सकाळच्या वेळी होणे अपेक्षित असताना पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेसाठी पेपर प्रत्यक्षात हातात दुपारी एक वाजेच्या सुमारास देण्यात आला. तोपर्यंत उमेदवारांना खाण्यासाठीही काहीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परिणामी, अनेक उमेदवारांनी कवायत मैदानाबाहेरील दुकानांमध्ये येऊन फास्टफूड, खाद्यपदार्थांचा आधार घेतला. भर दुपारी तळपत्या उन्हात दीड तासाची लेखी परीक्षा उमेदवारांसाठी अग्निदिव्यच ठरले. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उमेदवारांना डोक्याला मुंडासे, रुमाल बांधावे लागले. पोटात अन्नाचा कण नाही आणि माथ्यावर तप्त ऊन या चक्रात अडकलेल्या उमेदवारांचे अक्षरश: हाल झाले. (प्रतिनिधी)