नाशिक : शहरात शुक्रवारी (दि. १४) ४१ अंश सेल्सिअस एवढ्या हंगामातील उच्चांकी तपमानाची नोंद झाली. गेल्या वर्षी एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात ४१ अंश तपमान नोंदविले होते. तर मे २०१६ मध्येही ४१ अंश सेल्सिअसचाच उच्चांक होता; मात्र यावर्षी एप्रिलच्या पहिल्या पूर्वार्धातच तपमानाने चाळिशी ओलांडली आहे. शहरात उन्हाचा तडाखा कायम असून, उष्ण वातावरणामुळे नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. गुरुवारी (दि. १३) ४०.९ इतक्या तपमानाची नोंद झाल्यानंतर तपमानाचा पारा चढाच असून, शुक्रवारी या हंगामातील सर्वाधिक तपमान नोंदले गेले. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीन दिवस सुमारे ४०.३ अंशांवर शहराचे तपमान स्थिरावले होते. त्यानंतर बुधवारी प्रथमच ४०.७ अंशांवर पारा सरकला आणि गुरुवारी दोन अंशांनी वाढ होऊन पारा ४१ अंशांच्या आसपास पोहोचला. (प्रतिनिधी)
पारा @ 41शहरात हंगामातील उच्चांकी तपमान
By admin | Updated: April 15, 2017 01:27 IST