शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

पोलीसपाटील मुलाखतींना उच्च न्यायालयाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:39 IST

नाशिक : पोलीसपाटील भरतीत अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याच्या मॅटच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे सोमवारी निफाडच्या प्रांत अधिकाºयांसमक्ष होणाºया उमेदवारांच्या तोंडी मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या सहा गावांतील पात्र ठरलेल्या अठरा उमेदवारांना मॅटने प्रतिवादी करून घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे मॅटपुढे नव्याने सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देपात्र ठरलेल्या अठरा उमेदवारांना मॅटने प्रतिवादी करून घ्यावे, असे आदेश उमेदवारांच्या फेर मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या

नाशिक : पोलीसपाटील भरतीत अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याच्या मॅटच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे सोमवारी निफाडच्या प्रांत अधिकाºयांसमक्ष होणाºया उमेदवारांच्या तोंडी मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या सहा गावांतील पात्र ठरलेल्या अठरा उमेदवारांना मॅटने प्रतिवादी करून घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे मॅटपुढे नव्याने सुनावणी होणार आहे.जिल्ह्णातील जवळपास सर्व तालुक्यांतील शेकडो रिक्त असलेली पोलीस पाटील व कोतवालांची भरती करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचे व दहा गुण कागदपत्रांना व दहा गुण तोंडी मुलाखतीसाठी देण्याचे धोरण निश्चित केले होते व त्या त्या उपविभागीय अधिकाºयांना या भरतीचे प्रमुख म्हणून नेमण्यात येऊन ही भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. जिल्ह्णातील अन्य तालुक्यांमध्ये या भरतीविषयी उमेदवारांच्या फारशा तक्रारी नसल्या तरी, निफाड व सिन्नर या दोन तालुक्यांत मात्र मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला होता व तशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी या भरतीची चौकशीही करून अन्याय झालेल्या उमेदवारांची फेर मुलाखत घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, तथापि, तत्पूर्वीच उमेदवारांनी मॅट तसेच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुमारे दीड वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मॅटने अन्याय झालेल्या उमेदवाराच्या बाजूने आपला कौल दिला होता व अन्याय झालेल्या परंतु पात्र ठरलेल्या उमदेवारांच्या फेर मुलाखती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार निफाडच्या प्रांत अधिकाºयांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता फेर मुलाखतीसाठी उमेदवारांना पत्र दिले होते. दरम्यान, सिन्नर तालुक्यातील सहा गावांतील पोलीस पाटील भरतीत अनियमितता असल्याने मॅटने काही ठराविक उमेदवारांच्याच मुलाखतीला परवानगी दिल्याने अन्य पात्र उमेदवारांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात त्यावर सुनावणी होऊन सर्वच उमेदवारांच्या फेर मुलाखती घेण्यात याव्यात, असे निर्देश मॅटला देण्यात आले. त्यामुळे मॅटच्या पुढच्या आदेशापर्यंत मुलाखतींना स्थगिती मिळाल्याने सोमवारी होणाºया उमेदवारांच्या फेर मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत.