शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या वृक्षतोडीला उच्च न्यायालयाची स्थगिती

By admin | Updated: April 8, 2017 01:05 IST

नाशिक : महापालिकेने गंगापूररोड, दिंडोरीरोड, पेठरोड याठिकाणी सुरू केलेल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली

 नाशिक : महापालिकेने गंगापूररोड, दिंडोरीरोड, पेठरोड याठिकाणी सुरू केलेल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, महापालिकेने आतापर्यंत केलेल्या वृक्षलागवडीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेने उच्च न्यायालयाच्याच निर्देशानुसार, गंगापूररोड, दिंडोरीरोड, पेठरोड आदि भागांत रस्त्यांत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोड करण्यास प्रारंभ केला होता. परंतु, महापालिकेकडून रस्त्यांत अडथळा न ठरणारेही वृक्ष तोडले जात असल्याची तक्रार पर्यावरणवाद्यांनी आयुक्तांची भेट घेऊन केली होती. महापालिकेने सुमारे ३७५ वृक्षांपैकी आतापावेतो सुमारे दोनशे वृक्षांची तोड करत रस्ते मोकळे केले आहेत. महापालिकेच्या या मोहिमेचे एकीकडे परिसरातील स्थानिक रहिवाशांकडून स्वागत होत असताना पर्यावरणवाद्यांनी मात्र महापालिकेच्या या वृक्षतोड मोहिमेस हरकत घेतली. त्याविरुद्ध पर्यावरणप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने महापालिकेच्या वृक्षतोडीला स्थगिती दिली असून, न्यायालयाला सद्यस्थितीतील वृक्षलागवडीसंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने आतापर्यंत किती वृक्षलागवड केली, किती वृक्षांचे पुनर्रोपण केले आणि कोणत्या प्रकारच्या, जातीच्या वृक्षांची तोड केली याची सारी माहितीही न्यायालयाने मागविली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर महापालिकेने वृक्षतोड थांबविली आहे.