केंद्र शासनाने नाशिकच्या प्रवासी वाहतुकीसाठी मंजूर केलेली पहिली टायर बेस्ड मेट्रोेची अनेक वैशिष्टे आहेत. ही सेवा टायर बेस्ड असणार असून अनेक बाबतीत वेगळेपण असलेली ही सेवा देशासाठी रोल मॉडेल ठरणार आहे.
* देशातील पहिली आगळीवेगळी संकल्पना असलेली ही मेट्रो सेवा आरामदायी, वेगवान, पूर्ण क्षमतेने वहन होते. पर्यावरणस्नेही तसेच डिझेल बसच्या तुलनेत कमी आवाज करणाऱ्या या बस आहेत.
* दोन्ही काॅरिडोरची पीक अवर पीक डायरेक्शन ट्रॅफिक (पीएचपीडीटी) १५ हजार इतकी आहे. कामकाजाच्या गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक अवरमध्ये दर दोन मिनिटांनी मेट्रो सुटतील.
* मेट्रो सेवेसाठी इलेक्ट्रिक बस कोचेस असतील. १५ बाय १८ मीटर आकाराच्या या कोचेसमधून सुमारे अडीचशे ते तीनशे प्रवासी वहन क्षमता असणार आहे.
* ही टायर बेस्ड मेट्रो असल्याने रबरी टायर असलेल्या बस ओव्हरहेड इलेक्ट्रीक सप्लायमधून चालतील. ज्याची क्षमता ६०० ते ७०० व्हीडीसी असणार आहे.
* रेल्वे आणि ट्रामप्रमाणेच ओव्हरहेड वायरमधून मेट्रोला वीजपुरवठा घेता येणार आहे.
* मेट्रोच्या बस कोचेस एअर कंडीशन्ड असतील. तसेच दरवाजे स्वयंचलित पद्धतीने बंद होतील. बसमध्ये आरामदायी आसन व्यवस्था असेल तसेच काेचेसमध्येच पब्लिक अनाऊसमेंट सिस्टीम असेल. त्यामुळे आगामी स्टेशन कोणते आहे, वैगरे माहिती मिळू शकेल.
* मेट्रोची स्थानकेदेखील अत्याधुनिक असणार आहेत. स्थानकांना स्टेअर केस, लिफ्ट आणि सुलभ सरकते जिने असतील.
* मेट्रो स्थानकाची वैशिष्ट्ये म्हणजे दोन्ही बाजूने प्रवासी आत येऊ शकतील किंवा बाहेर पडू शकतील. ज्यामुळे रस्ता किंवा पटरी ओलांडण्याची गरज नाही आणि त्यामुळे अपघात टळू शकतील.
कोट...
नाशिक हे देशातील पहिले शहर आहे जेथे एमआरटीएस सिस्टीमसारख्या अत्यंत नव्या संकल्पनेच्या प्रयोगासाठी थेट केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. नाशिकमधील अशा प्रकारचा हा मेट्रो सेवेतील प्रयोग हा भारतातच नव्हे तर विदेशातील गेम चेंंजर ठरेल.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो