शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कान्हेरे मैदानावर हेरिटेज क्लॉक टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:57 IST

मनपाचा प्रस्ताव : मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीच्या टॉवरची प्रतिकृती नाशिक : गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील प्रेक्षक गॅलरीच्या वर सुमारे ४० फूट उंचीचे हेरिटेज क्लॉक टॉवर साकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, येत्या महासभेवर प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे.

मनपाचा प्रस्ताव : मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीच्या टॉवरची प्रतिकृतीलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील प्रेक्षक गॅलरीच्या वर सुमारे ४० फूट उंचीचे हेरिटेज क्लॉक टॉवर साकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, येत्या महासभेवर प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे. महापालिकेच्या मालकीचे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात देण्यात आलेले असून, याठिकाणी क्रिकेटचे मैदान साकारण्यात आले आहे. याच मैदानावर सुमारे २० फूट प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आलेली आहे. मैदानाची एक ओळख तयार व्हावी आणि प्रतीकात्मक स्वरूपात त्याचे बोधचिन्हही साकारले जावे, या उद्देशाने माजी महापौर यतिन वाघ यांनी सन २०१४ मध्ये सदर मैदानावर लॉर्ड्सच्या धर्तीवर हेरिटेज क्लॉक टॉवर उभारण्याची संकल्पना मांडली होती आणि महापौर निधीतून त्यासाठी सुमारे १६ लाख रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली होती. त्यात मनसेच्या नगरसेवक सुजाता डेरे यांनीही सदर टॉवर साकारण्यासाठी त्यांचा नगरसेवक निधी देऊ केला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा क्लॉक टॉवरचा विषय पुढे आला असून, मैदानावर हेरिटेज क्लॉक टॉवर साकारण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केला आहे. सदर क्लॉक टॉवर जुन्या नगरपालिकेच्या इमारतीवरील क्लॉक टॉवरच्या धर्तीवर उभारण्याचे प्रस्तावित आहे. असा असेल क्लॉक टॉवरमेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीवरील टॉवर क्लॉकची हुबेहूब प्रतिकृती फायबरमध्ये साकारली जाणार आहे. त्याची उंची सुमारे ४० फूट असणार आहे. त्यातील घड्याळाची डायल १० फुटाची राहणार असून, लांब अंतरावरूनही या घड्याळाचे दर्शन होणार आहे. सदर क्लॉक टॉवरचे डिझाइन लान्सर कंपनीकडून मागविण्यात आले आहे. सदर कंपनीनेच गंगापूररोडवरील शहीद सर्कलचे डिझाइन केलेले आहे.