शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टरांचीही घेणार मदत

By admin | Updated: March 21, 2017 00:16 IST

पालकमंत्री : स्वाइन फ्लूबाबत आरोग्य सुविधेचा घेतला आढावा

पालकमंत्री : स्वाइन फ्लूबाबत आरोग्य सुविधेचा घेतला आढावानाशिक : नाशिकमध्ये स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण आढळत असल्याने व काही रुग्णांचा मृत्यूही झाल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय विश्रामगृह येथे तातडीने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी या आजाराच्या उपचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांनी बैठक बोलविली होती. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल अहेर, अपूर्व हिरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमहापौर प्रथमेश गिते उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी स्वाइन फ्लू रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची आणि शासकीय रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षांची माहिती घेतली. तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याने याबाबत खासगी डॉक्टरांचीही बैठक घेऊन त्यांना रुग्णांची माहिती देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. आठवडे बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. पी. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी स्वाइन फ्लू रुग्णांवरील उपचाराची माहिती दिली.