शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या कंपनीतून हेल्पर करत होता रेमडेसिविरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST

मागील आठवड्यात आडगाव शिवारात असलेल्या एका महाविद्यालयासमोर रेमडेसिवर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करताना तीन नर्ससह सिडकोतील एका मेडिकलमध्ये काम ...

मागील आठवड्यात आडगाव शिवारात असलेल्या एका महाविद्यालयासमोर रेमडेसिवर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करताना तीन नर्ससह सिडकोतील एका मेडिकलमध्ये काम करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला गती देत संशयितांच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीवरून पोलिसांनी रविवारी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून २० बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. तसेच या रेमडेसिविर काळाबाजाराचे धागेदोरे थेट पालघर जिल्ह्यात पोहचल्याचे तपासात पुढे आल्यानंतर आडगाव पोलिसांचे एक पथक पालघरला रवाना झाले.

येथील एका कंपनीत संशयित सिद्धेश अरुण पाटील हा हेल्पर म्हणून काम करतो आणि त्याच्याकडून इंजेक्शनच्या बाटल्यांचा कंपनीच्या बाहेर काळ्याबाजारात पुरवठा होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक राजेंद्र कपले, हवालदार सुरेश नरवडे, भास्कर वाढवणे, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी, सचिन बाहिकर, वैभव परदेशी, विश्वास साबळे, देवानंद मोरे आदींच्या पथकाने कंपनीच्या परिसरात सापळा रचला. संशयित सिद्धेश यास शिताफीने पथकाने बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने नाशिकला इंजेक्शन दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ६३ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. आतापर्यंत या टोळीकडून पोलिसांनी सुमारे ८५ रेमडेसिविरच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. त्यातील ६३ बाटल्यांना लेबल नसल्याने यात लेबल तयार करून देणाऱ्या

दुसऱ्या संशयिताचाही सहभाग असण्याची श्यक्यता आहे. यामुळे या गुन्ह्यात आणखी संशयित निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

----इन्फो---

श्रीमंत होण्याचा ‘शॉर्टकट’ घेऊन गेला तुरुंगात

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा मुख्य संशयित सिद्धेश पाटील हा पालघर जिल्ह्यातील एका औषध बनविण्याच्या कंपनीत हेल्पर म्हणून नोकरीला आहे. रेमडेसिविरचा काळ्याबाजारात पुरवठा करणारा हा म्होरक्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने नाशिकसह अन्य काही शहरांमध्येही रेमडेसिविरचा पुरवठा केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पालघरहून संशयित अभिषेक शेलार यास पालघरमधून अटक केली होती. शेलार हादेखील त्याच कंपनीत मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्यामुळे शेलार व पाटील यांची ओळख झाली होती. त्यातूनच दोघांनी संगनमत करत रेमडेसिविर इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन काळाबाजार करत कमी वेळेत अधिक श्रीमंत होण्याचा ‘शॉर्टकट’ निवडला. मात्र, हा शॉर्टकट त्यांना थेट कारागृहात घेऊन गेला.

----इन्फो--

लेबल नसलेल्या बाटल्यांवर डल्ला

सिद्धेश औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात हेल्पर असल्याने कंपनीत तयार झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या लेबल

नसलेल्या बाटल्या (वायल्स) चोरी करून नंतर अभिषेकला पुरवित होता. यानंतर शेलार दलालीच्या माध्यमातून काळ्याबाजारात हे इंजेक्शन अवाच्या सव्वा दरात विक्री करत होता, असे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. बाटल्यांवर लेबल नसल्यामुळे इंजेक्शन कोठून आणले जात आहे, याचा सुगावा लागत नव्हता.

---इन्फो---

राजकीय वरदहस्त अन‌् कंपनीभोवती संशयाचे ढग

पोलिसांनी पालघर जिल्ह्यात औषध बनविणाऱ्या कंपनीतून मुख्य संशयित सिद्धेश पाटीलला बेड्या ठोकल्या आहेत. सदर कंपनी एका माजी मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या नातेवाइकाची असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या काही नेत्यांनी गुजरातमध्ये कोरोना रुग्णांना वाटप केलेले रेमडेसिविर याच कंपनीमधून तर उपलब्ध करून घेतले नव्हते ना? याचा शोध पोलीस घेणार आहेत तर या कंपनीला औषध तयार करण्याचा ठेका

दुसऱ्या एका कंपनीने दिला असल्याने या कंपनीतून किती रेमडेसिविर तयार झाले आणि ते कुठेकुठे पाठविले याची नोंदणी आहे, का याचा तपास लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.