शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ओखी वादळग्रस्तांना दोन दिवसांत मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:20 IST

नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील दीड हजार शेतकºयांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत सदरची रक्कम शेतकºयांच्या बॅँक खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देदीड हजार शेतकरीथेट खात्यावर होणार पैसे जमामहाराष्टÑातील बहुतांशी भागात ओखी चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला,

नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील दीड हजार शेतकºयांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत सदरची रक्कम शेतकºयांच्या बॅँक खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे आदेश दिले आहेत. अरबी समुद्रात पोहोचलेल्या ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यात ४ व ५ रोजी हवामानात आमूलाग्र बदल होऊन वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. महाराष्टÑातील बहुतांशी भागात ओखी चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला, परंतु कोकण व नाशिक विभागात त्याचा फटका शेतपिकांना बसला होता. नाशिक जिल्ह्णातील मालेगाव, सटाणा, निफाड, चांदवड, देवळा, दिंडोरी, कळवण या तालुक्यात सलग दोन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे शेतात उभी असलेली पिके नष्ट झाली होती. विशेष करून या वादळाचा व पावसाचा फटका द्राक्ष पिकाला सर्वाधिक बसला. द्राक्ष घडांमध्ये मनी भरण्याचे तर काही ठिकाणी फुलोरा लागलेला असताना पावसामुळे फुलोरा झडून गेला, द्राक्ष मण्यांनाही तडे पडले. नाशिक जिल्ह्णातील १७० गावातील सुमारे दीड हजार शेतकºयांना या ओखी वादळाचा फटका सहन करावा लागला. १२९५ हेक्टर क्षेत्रावर त्याचा परिणाम झाल्याने द्राक्ष बागायतदारांना प्रचंड नुकसान सोसावे लागले. पावसाने दोन दिवस झोडपून काढल्यानंतर हवालदिल झालेल्या शेतकºयांनी पाऊस उघडल्यावर शेतीची सारवा सारव करून टाकली व त्यानंतर शासनाने ओखी वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रतिहेक्टरी १३,५०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु दोन महिने उलटूनही सरकारकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले होते. या संदर्भात गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक जिल्ह्णासाठी दोन कोटी ३७ लाख ३७ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांकडे वर्ग केला असून, येत्या दोन दिवसांत सदरचे पैसे शेतकºयांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. शिवाय या या पैशांमधून बॅँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.