शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी कन्या भाग्यश्री योजने’तून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:36 IST

नाशिक : एक अथवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाºया कुटुंबास ५० व २५ हजारांची मदत शासनाकडून ‘माझी कन्या भाग्यश्री योजने’तून मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली.

नाशिक : एक अथवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाºया कुटुंबास ५० व २५ हजारांची मदत शासनाकडून ‘माझी कन्या भाग्यश्री योजने’तून मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली.बुधवारी (दि.९) महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक सभापती अर्पणा खोसकर यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. सदस्य गणेश अहिरे यांनी अंगणवाडी केंद्रात बालक, किशोरवयीन मुली, मातांना कोणकोणता आहार दिला जातो, याची माहिती अंगणवाडी सेविका देत नाही. जिल्हास्तरावरून हा आहार पुरवठा केला जात असल्याने स्थानिक पातळीवर योग्य नियोजन होत नसल्याने हा प्रश्न उद्भवत असल्याचा आरोप केला. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहारासंदर्भात कोणतीही तक्रार आल्यास त्याची बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी दखल घ्यावी व जिल्हा परिषद सदस्यांनी माहिती विचारल्यास तत्काळ द्यावी, अशी सूचना केली. पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी केंद्रास समक्ष भेटी देऊन सखोल तपासणी करावी. अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना वेळेवर नियमित आहार देण्याबाबतच्या कडक सूचना सभापती अर्पणा खोसकर यांनी दिल्या. माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना १ आॅगस्ट २०१७ पासून लागू झालेली आहे. तिची माहिती विभागाच्या अधिकाºयांनी दिली. या योजनेचा व्यापक प्रचार व प्रसार होण्यासाठी योजनेची माहिती अंगणवाडी केंद्रांच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना सभापती अर्पणा खोसकर यांनी दिल्या. एका मुलीनंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलीच्या नावे ५० हजार रुपयेबॅँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल.बैठकीस गणेश अहिरे, रेखा पवार, कविता धाकराव, कला अहेर, सुनीता सानप, वैशाली खुळे, आशा पवार, सुमन बर्डे आदी उपस्थित होते. १८ व्या वर्षी व्याज काढता येईलमुलीच्या वयाच्या ६, १२ व १८ व्या वर्षी अनुज्ञेय व्याज काढता येईल. दोन मुलींनंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्या व दुसºया मुलीच्या नावे प्रत्येकी रुपये २५ हजार याप्रमाणे ५० हजार रुपये इतकी रक्कम बॅँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल. माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ १ आॅगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यानंतरच्या जन्मलेल्या मुलींना अनुज्ञेय राहील, असे स्पष्ट करण्यात आले.