शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटची सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर?

By admin | Updated: October 27, 2015 22:46 IST

पोलिसांपुढे पेच : सोनसाखळी चोरीच्या वाढणार घटना

इंदिरानगर : जीविताच्या रक्षणासाठी हेल्मेट व सीट बेल्ट अत्यावश्यक असून, आरटीओ व पोलीस विभागाने सोमवारपासून कडक कारवाई सुरू केली आहे़ दुचाकीधारकांसाठी जीवदान ठरणारे हेल्मेट आवश्यक असले तरी, ही हेल्मेटसक्ती सोनसाखळी चोरट्यांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे़ एरवी धूम स्टाईलने फरार होणाऱ्या चोरट्यांना ओळखणे कठीण असताना त्यात ते हेल्मेटधारी असतील, तर विचारायलाच नको, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे़शहरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यामध्ये खून, घरफोडी, तोतया पोलीस, रिक्षाद्वारे अपहरण करून लूट, खून, विनयभंग यांबरोबरच सोनसाखळी खेचून नेल्याच्या घटनांचा समावेश आहे़ या गुन्ह्यांना अटकाव करण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे़ त्यातच प्रादेशिक परिवहन विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची उपरती झाली असून, त्यादृष्टीने त्यांनी दुचाकीधारकांना हेल्मेट, तर चारचाकीधारकांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक केले आहे़सोमवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आरटीओ व पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करण्यास प्रारंभ केला असून, दिवाळीपूर्वीच वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे़ जीविताच्या रक्षणासाठी या नियमांचे पालन करणे गरजेचे असले तरी हेल्मेट घालून सोनसाखळी चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यातच या चोरट्यांच्या दुचाकीवरील क्रमांकही खरा असेलच असे सांगता येत नाही़ त्यामुळे ही सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे़