शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:48 IST

सटाणा : दुष्काळाने हैराण झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली न करता त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासोबतच वीजबिल थकीत असलेल्या शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडू नका. बागलाण तालुक्यातील ज्या ५१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे अशा गावांना टँकरच्या फेºया वाढविण्यासोबतच ज्या गावांनी टँकरची मागणी केली आहे त्या गावांचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून मुबलक पाणी उपलब्ध करून द्या तसेच आगामी खरीप हंगामात शेतकºयांना मुबलक बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचे आदेश धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी अधिकाºयांना दिले आहेत.

ठळक मुद्देसटाणा : बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कनेक्शन न तोडण्याच्या सूचना

सटाणा : दुष्काळाने हैराण झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली न करता त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासोबतच वीजबिल थकीत असलेल्या शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडू नका. बागलाण तालुक्यातील ज्या ५१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे अशा गावांना टँकरच्या फेºया वाढविण्यासोबतच ज्या गावांनी टँकरची मागणी केली आहे त्या गावांचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून मुबलक पाणी उपलब्ध करून द्या तसेच आगामी खरीप हंगामात शेतकºयांना मुबलक बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचे आदेश धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी अधिकाºयांना दिले आहेत.येथील पंचायत समिती सभागृहात शनिवारी (दि. ८) खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बागलाण तालुक्यातील सर्व विभागप्रमुख, अधिकाºयांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. भामरे बोलत होते.या आढावा बैठकीला वाळू उपसा, अवैध वृक्षतोड, महावितरणची अरेरावी, बँकांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली, डांगसौंदाणे येथे नुकताच कोसळलेला जलकुंभ याबाबत खासदार डॉ. भामरे यांच्याकडे तालुक्यातील शेकडोनागरिकांनी अधिकाºयांसमक्ष गंभीर तक्रारी केल्याने डॉ. भामरे यांनी अधिकाºयांना चांगलेच फैलावर घेत तुमचे धंदे आता बंद करा आणि बेकायदेशीर वाळू उपशासह रेशनचा काळाबाजार थांबवा, अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण आणण्यासोबतच आगामी वृक्षलागवडीचे बागलाणमधून ४ लाख ६२ हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.डांगसौंदाणे येथील जलकुंभ कोसळून महिना लोटला तरी अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याची तक्रार एका नागरिकाने केल्यानंतर डॉ. भामरे यांनी या प्रकरणात दोषी असलेल्यांवरकडक कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या.आढावा बैठकीला प्रांत प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्यासह वनविभाग, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, बँकांचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, पाटबंधारे विभाग यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, भाजपचे पदाधिकारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकºयाने कथन केली आप बिती; महावितरणचे अधिकारी घामाघूममहावितरणच्या ग्रामीण सहायक अभियंता कल्याणी भोये यांच्याबाबत तिळवण येथील एका शेतकºयाने संतापजनक आप बिती कथन केली. मी माझ्या घराचे वीजबिल वेळेवर भरत असतानाही कल्याणी भोये माझ्या घरी आल्या. माझा अपघात झाल्याने आणि दोन्ही पाय मोडलेले असताना घरात कोणीही नसताना भोये यांनी तुमच्या घराची झडती घ्यायची आहे असे सांगत काहीएक कारण नसताना त्यांनी घराची झडती घेत एकेरी भाषा वापरली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओच दाखविण्याची त्या शेतकºयाने तयारी दाखविल्याने खासदार डॉ. भामरे चांगलेच आक्र मक झाले. आढावा बैठकीला उपस्थित महावितरणच्या अधिकाºयांना डॉ. भामरे यांनी त्या महिला अधिकाºयाला निलंबित करा, असे फर्मान सोडल्याने महावितरणचे अधिकारी घामाघूम झालेले दिसले.