शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कॉलनी रोडमधून अवजड वाहनांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 22:23 IST

देवळा : नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने शेतमालाची वाहतूक करणाºया अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांनी सदरची वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी संदीप भोळे यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देदेवळा : वर्दळीमुळे नागरिक त्रस्त; मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने शेतमालाची वाहतूक करणाºया अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांनी सदरची वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी संदीप भोळे यांना देण्यात आले आहे.देवळा नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र . १६ मध्ये. ३५ वर्षांपूर्वी स्व. रामराव पुंजाजी आहेर यांनी पुढाकार घेऊन रामराव हौसिंग सोसायटी या शिक्षक कॉलनीची निर्मिती केली होती. सेवानिवृत्त शिक्षक येथे मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.वाजगाव व कळवण या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी ही कॉलनी आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाजगाव, वडाळे, खर्डा, देवळा शहराचा पश्चिम भाग, रामेश्वर, कनकापूर,कांचणे, मुलुखवाडी, शेरी, वार्शी, हनुमंत पाडा आदी गावातील शेतकरी आपला शेतमाल विक्र ीसाठी कळवण रस्त्यावर असलेल्या नवीन बाजार समिती आवारात घेऊन येतात. या कॉलनीपासून १०० मीटरवर असलेल्या देवळा शहराकडील मुख्य रस्त्याने कांदा मार्केटकडे न जाता शॉर्टकट म्हणून रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने कांद्याने भरलेले ट्रॅक्टर व इतर वाहने शेतकरी घेऊन जातात. यामुळे दिवसभर कॉलनी वसाहतीत ट्रॅक्टर, पिकअप, बैलगाडी, रिक्षा आदी वाहनांची वर्दळ सुरू असते. पहाटे ५ वाजेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत दिवसभरात दीडशे ते दोनशे वाहने कॉलनी रस्त्याने ये-जा करतात. यामुळे कॉलनीतील शांतता भंग झाली आहे.या वाहनांमुळे दिवसभर सर्वत्र धूळ उडत असते. ही धूळ घरातील वस्तूंवर बसते. यामुळे महिलादेखील त्रस्त झाल्या आहेत. धूळ व ध्वनीप्रदूषणाचा येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. या कॉलनी रस्त्याने होणारी वाहनांची वाहतूक बंद करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.निवेदनावर दादाजी निकम, नामदेव सोनवणे, दोधू बच्छाव, पोपट पगार, दिपक पवार, उत्तम पगार, अरुण आहेर, विष्णू मोरे, किसन निकम, शशिकांत शिंदे, दादाजी आहेर, रामकृष्ण दशपुते आदींसह कॉलनीतील नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत.कॉलनी रोडने जाणारी वाहने भरधाव जातात. अपघात होण्याच्या भीतीमुळे लहान मुलांचे घराबाहेर खेळणे बंद झाले आहे. वाहतूक बंद करण्याचा आम्ही अनेकवेळा प्रयत्न केला. परंतु वाहनचालक जुमानत नाहीत. समजावण्याचा प्रयत्न केला तर दमदाटीची भाषा करतात. यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून कॉलनीतील वाहतूक बंद करावी.- वैभव भामर, रहिवासीकॉलनीच्या दोन्ही बाजूला कळवण व वाजगाव रस्त्यावर ‘अवजड वाहनांना प्रवेशबंद’ असे फलक लवकरच लावण्यात येतील. तसेच या कॉलनीतील वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत देवळा पोलीस ठाण्याला पत्र देणार आहे.-संदीप भोळे,मुख्याधिकारी, देवळा

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी