शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने घटले ३६ टॅँकर

By admin | Updated: September 19, 2015 23:08 IST

दमदार पावसाने घटले ३६ टॅँकर

नाशिक : शुक्रवारी दिवसभर बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई झपाट्याने कमी होत असून, एकाच दिवसाच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील ३६ पाणी टॅँकर तत्काळ बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारनंतर पुन्हा पुनर्पाहणी करून टॅँकर बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सांगितले.जिल्ह्यात प्रामुख्याने दुष्काळी आणि टंचाईग्रस्त समजल्या जाणाऱ्या पूर्व भागात गेल्या आठ दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्व भागातील गावांवरील पाणीटंचाईचे संकट काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. सिन्नर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या निम्म्यावर आली आहे. सिन्नर तालुक्यात शंभरहून गाव-वाड्यांना २९ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. शुक्रवारच्या दमदार पावसानंतर २९ पैकी १४ खासगी पाणीपुरवठा करणारे टॅँकर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ १५ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येवल्यातही यावर्षी पाणीटंचाईची परिस्थिती बिकट होती. मात्र शुक्रवारच्या दमदार पावसामुळे तिही कमी झाली आहे. येवल्यात २० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात १६ टॅँकरने पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला असून, चार टॅँकरने तूर्तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातही सोमवारी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत पुनर्पाहणी करून हे टॅँकरही बंद करायचे की सुरू ठेवायचे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. नांदगावला नऊ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यातील एक टॅँकरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. चांदवड तालुक्यात सात टँकरने टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात पाच टॅँकर बंद करण्यात येऊन दोन टॅँकरच आता पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू ठेवले आहे. अन्य तालुक्यांतूनही पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या घटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)