शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शहर तापले : पालिकेच्या कोरड पडलेल्या पाणपोर्इंनाच श्रध्दांजली !

By admin | Updated: April 13, 2017 15:55 IST

महापालिकेच्या कोरड्याठाक पडलेल्या पाणपोर्इंना सत्ता बदलानंतरही अद्याप ‘अच्छे दिन’ येऊ शकलेले नाही.

नाशिक : एकीकडे शहराचे वातावरण दिवसेंदिवस उष्ण होत असून नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे; मात्र दुसरीकडे महापालिकेच्या कोरड्याठाक पडलेल्या पाणपोर्इंना सत्ता बदलानंतरही अद्याप ‘अच्छे दिन’ येऊ शकलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने शहरातील पाणपोई मृत झाल्याचे घोषित करत त्यांना श्रध्दांजली वाहिली.गेल्या महिन्यात शहराचे तपमान सलग तीन दिवस ४०.३ अंशावर स्थिरावले होते. यावेळी शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांक डे निवेदनाद्वारे शहरातील पाणपाईंची दुरवस्था थांबवून त्याचा उपयोग नागरिकांना करून देण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, ‘लोकमत’ने देखील शहरामधील विविध चौकांमध्ये केवळ शोभेपुरत्या उरलेल्या पाणपार्इंच्या छायाचित्रांसह वृत्त प्रसिध्द करून पालिक ा प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. ज्या दिवशी हे वृत्त प्रसिध्द झाले त्याच दिवशी शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’च्या प्रतीसह निवेदन अधिकाऱ्यांना सादर करत पाणपोई दुरूस्त कराव्या, अन्यथा श्रध्दांजली वाहण्याचा इशारा दिला होता. यानुसार शहराच्या वर्दळीच्या ठिकाण समजल्या जाणाऱ्या एमजीरोडवरील महापालिकेच्या पाणपोईला कार्यकर्त्यांना गुरूवारी (दि.१३) पुष्पचर्क अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे सचिन बांडे, उमेश चव्हाण, नाना काळे, राजू राठोड, सुनील जाधव आदि उपस्थित होते. यावेळी पाणपोईवर ‘भावपूर्ण श्रध्दांजली’चा फलकही लावण्यात आला.