शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदलातील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 19:01 IST

राजापूर : तालुक्यातील सोमठाण जोश येथील भारतीय सैन्य दलातील मेजर नवनाथ कारभारी आगवन (४३) यांचे पुणे येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी (दि.२९) सोमठाण जोश येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या जवानांनी हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.

ठळक मुद्दे सैन्य दलाच्या जवानांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजापूर : तालुक्यातील सोमठाण जोश येथील भारतीय सैन्य दलातील मेजर नवनाथ कारभारी आगवन (४३) यांचे पुणे येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी (दि.२९) सोमठाण जोश येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या जवानांनी हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.नवनाथ आगवन पुणे येथील सैन्य दलात मेजर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. शुक्र वारी (दि.२८) कर्तव्यावर असताना आगवन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. निधनाची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव शनिवारी येवला तालुक्यातील सोमठाण जोश येथे पोहोचल्यावर पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याच शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या जवानांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी शिवसेनेचे संभाजीे पवार, दिनेश आव्हाड, प्रविण गायकवाड, प्रमोद बोडखे, लक्ष्मण घूगे, समाधान चव्हाण, शंकरराव अलगट, बाळासाहेब दाणे, रामभाऊ केदार आदींनी नवनाथ आगवन यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. नवनाथ आगवण हे जेष्ठ नेते कारभारी आगवण यांचे चिरंजीव तर राजापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब आगवण यांचे ते बंधू होत.