शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सागर चौधरीच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

By admin | Updated: October 25, 2015 23:42 IST

सादरे आत्महत्त्या : सागर चौधरीची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची

नाशिक : जळगाव येथील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि़२६) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे़ दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य संशयित पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व प्रभाकर रायते यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला नाही़निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी शुक्रवारी (दि़१६) सायंकाळी आडगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ तत्पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांकडून कलेक्शन, दिवाळी गिफ्टची मागणी म्हणून ‘सोने’ तसेच वाळू ठेकेदार सागर चौधरीच्या दबावावरून खोट्या गुन्ह्यात अडकविले़ वरिष्ठांच्या या सततच्या त्रासामुळेच आत्महत्त्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले होते़ सादरे यांच्या आत्महत्त्येनंतर दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी माधुरी सादरे यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात जळगावचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी (रा़ प्लॉट नंबर १३५, शनी पेठ, चौगुले प्लॉट, जळगाव) यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला़संशयित चौधरीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अ‍ॅड. बिपिन पांडे यांच्यामार्फत मंगळवारी (दि़२०) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला़ या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे़ वेगळा न्याय का?आत्महत्या करणाऱ्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे असतात त्यांना पोलीस लागलीच अटक करतात. मग या प्रकरणात पोलीस अधीक्षक सुपेकर, निरीक्षक रायते व वाळू माफिया सागरचे नाव आहे. त्यांना मात्र अटक झालेली नाही. इतर आरोपींना वेगळा व अधिकारी, माफियांना वेगळा न्याय कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चौधरी यावर तडीपारीची कारवाई झाली होती. मात्र प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी न झाल्याने त्यास राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. उद्या त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होत असल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

सागर चौधरी याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. अधिकार्‍यांना धमकावणे, खोट्या गुन्ह्यात अडकविणे, राजकीय दबावाचा वापर करणे असे प्रकार त्याने केले आहेत. जळगावच्या विविध पोलीस ठाण्यात सागर चौधरी याच्या विरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत.