शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीवरील वादगस्त पुलाबाबत नगरविकास मंत्र्यांकडे सुनावणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST

नाशिक : शहरातील गंगापूर रोड येथे गोदावरी नदीवर आणखी दोन पूल बांधण्यात येेणार असून, त्यातील पुलांवर आक्षेप घेणाऱ्या ...

नाशिक : शहरातील गंगापूर रोड येथे गोदावरी नदीवर आणखी दोन पूल बांधण्यात येेणार असून, त्यातील पुलांवर आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्यांची राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच सुनावणी घेण्यात आली आहे. ही सुनावणी पूर्ण झाल्याने, आता शासन काय निर्णय घेते, याकडे गंगापूर रोडवरील पम्पिंग स्टेशन परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. गोदावरी नदी शहरातून वाहत जाताना मुळातच गंगापूर रोड परिसरात आसाराम बापू आश्रमाजवळ महापालिकेने पूल बांधला आहे. त्या पलीकडे फॉरेस्ट नर्सरी परिसरातही पूल आहे. त्यानंतर इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाकडून हनुमानवाडीकडे जातानाही पूल आहे. अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर अंतरातच तीन पूल बांधले जात असताना, याच दरम्यान आणखी दाेन पूल बांधण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यात गोदापार्कजवळील पुलाचे काम जोरात सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला पम्पिंग स्टेशनजवळून कुसुमाग्रज स्मारकाच्या दरम्यान जाणाऱ्या जलवाहिनीलगत आणखी एक पूल बांधण्याचे नियोजन आहे. हा पूल स्थायी समितीने मंजूर करताना, भाजपच्याच आमदार देवयानी फरांदे यांनीही विरोध केला होता.

या पुलामुळे पुराचा धोका आणखी वाढणार असून, परिसरातील नागरिक बाधित होण्याची शक्यता आहे, तोच मुद्दा घेऊन चव्हाण कॉलनी परिसरातील नागरिकांनी या पुलाच्या बांधकामास हरकत घेतली, परंतु स्थानिक पातळीवर महापालिकेकडून प्रतिसाद न मिळाल्याने, अखेरीस या नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पुलामुळे नदीच्या प्रवाहाला अवरोध निर्माण होणार असून, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन परिसरातील ज्या बाजूने नागरी वसाहत आहे, तेथे पाणी शिरण्याची शक्यता आहे. या भागात नदीचे पात्र लहान असल्याने, ही स्थिती निर्माण होऊ शकते. मुळात पुलाच्या दुसऱ्या बाजूने नागरी वसाहत नाही, तसेच नियोजित पुलाच्या जागेपासून दोन्ही बाजूने अवघ्या पाचशे-पाचशे मीटर अंतरावर दोन भव्य पूल आहेत. त्यामुळे आता आणखी पुलांची गरज नसताही पूल साकारण्यामागे आर्थिक लाभ हेच कारण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात उच्च न्यायालयात नागरिकांनी दाद मागिल्यानंतर, गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी नगरविकास मंत्र्यांना याबाबत सुनावणी घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे महापालिकेला शासनाने तसे कळवून, या संदर्भात अहवाल मागवितानाच तोपर्यंत पूल बांधण्यास स्थगिती दिली होती.

इन्फो..

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या ३ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीच्या वेळी डॉ. प्रकाश पाटील, डॉ.परीक्षित महाजन, आर्किटेक्ट पंडित काकड, बाळासाहेब कोल्हे यांच्यासह अन्य रहिवाशांनी बाजू मांडली. आता शासन काय निर्णय देणार, यावर पुलाचे पुढील भवितव्य ठरणार आहे.